सरताळेत गेस्ट्रो सद्रुश साथीमुळे खळबळ 

सरताळेत गेस्ट्रो सद्रुश साथीमुळे  खळबळ 

सरताळेत गेस्ट्रो साथीमुळे खळबळ 

वाई दौलतराव पिसाळ 


सरताळे ता.जावली येथील गावा मध्ये पिण्याचे पाणी दुषित होऊन ते पिण्यासाठी वापरले गेल्याने ग्रामस्थांना जुलाबांचा त्रास होऊ लागल्याने खळबळ ऊडाली आहे सविस्तर वृत्त असे कि सरताळे ता.जावली या गावची १ लाख लिटर क्षमतेची पिण्याच्या पाण्याची टाकी १९८४ साली बांधण्यात आली आहे या टाकीला आज ३२ वर्ष पुर्ण झाल्याने ति टाकी जीर्ण झाल्याने त्याला गळती लागली आहे या पिण्याच्या पाणी  टाकीत पाणी सोडण्या साठी नेमण्यात आलेल्या कर्मचार्यां कडुन मर्यादे पेक्षा जास्त टिसीयलचा वापर झाल्याने पाणी दुषित झाल्याने  सरताळे गावामध्ये गेस्ट्रोची साथ पसरल्याने अंदाजे ५० लोकांना त्याची लागण झाल्याने ग्रामस्थांन मध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

आधीच कोरोनो रोगाचे मोठे संकट समोर असतानाच नव्याने सुरु झालेल्या  या  गॅस्ट्रोच्या साथीने नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे हि साथ आटोक्यात आणण्या साठी सरताळे ता.जावली ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच सोनाली पवार उपसरपंच सुनील धुमाळ ग्रामसेवक बोराटे  यांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन विहिरीतील दुषित झालेले पाणी उपसून काढुन टाकले आहे व जलकुंभ स्वच्छ धुऊन काढला आहे गावाच्या ज्या विभागा मध्ये गेस्ट्रोची लागण झाली आहे तेथील ग्रामस्थांना ग्रामपंचायती मार्फत मेडीक्लोअर वाटण्यात आले आहे तर कुडाळ येथील प्राथमीक आरोग्य केंद्रा मार्फत आरोग्य रक्षक आशा ताई यांच्या मार्फत घरटी फिरुन सर्वेक्षण करण्याचे काम सुरु आहे आज दि.१६ रोजी रोजी जवळपास ५० ग्रामस्थांना या साथीने विळखा टाकला आहे येथील संतोष संपत येवले या ग्रामपंचायत कर्मचार्यां मुळे व त्याच्या हलगर्जी पणामुळे सरताळे गावांत गॅस्ट्रोची साथ पसरल्याने गावासह मेढा तालुक्यात खळबळ