‘जयवंत शुगर्स’चे ७ लाख मेट्रीक टन गाळपाचे उद्दिष्ट - डॉ. सुरेश भोसले

जयवंत शुगर्स साखर कारखान्याच्या ११ व्या गळीत हंगामाला उत्साहात प्रारंभ झाला. ‘जयवंत शुगर्स’चे संस्थापक तथा य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. उत्तरा भोसले यांच्या हस्ते गव्हाणीत ऊसाची मोळी टाकून गळीत हंगामाचा प्रारंभ करण्यात आला. या हंगामात कारखान्याने ७ लाख मेट्रीक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे.

‘जयवंत शुगर्स’चे ७ लाख मेट्रीक टन गाळपाचे उद्दिष्ट - डॉ. सुरेश भोसले
फोटो : धावरवाडी : जयवंत शुगर्स साखर कारखान्याच्या गव्हाणीत ऊसमोळी टाकून ११ व्या गळीत हंगामाचा प्रारंभ करताना संस्थापक डॉ. सुरेश भोसले, सौ. उत्तरा भोसले, पृथ्वीराज भोसले, विनायक भोसले व अन्य मान्यवर.

‘जयवंत शुगर्स’चे ७ लाख मेट्रीक टन गाळपाचे उद्दिष्ट

डॉ. सुरेश भोसले : ११ व्या गळीत हंगामाला उत्साहात प्रारंभ

कराड/प्रतिनिधी :

      धावरवाडी ता. कराड येथील जयवंत शुगर्स साखर कारखान्याच्या ११ व्या गळीत हंगामाला उत्साहात प्रारंभ झाला. जयवंत शुगर्सचे संस्थापक तथा य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. उत्तरा भोसले यांच्या हस्ते गव्हाणीत ऊसाची मोळी टाकून गळीत हंगामाचा प्रारंभ करण्यात आला. या हंगामात कारखान्याने ७ लाख मेट्रीक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. 

      याप्रसंगी श्री. पृथ्वीराज भोसले, श्री. विनायक भोसले, ‘जयवंत शुगर्सचे चेअरमन चंद्रकांत देसाई, प्रेसिडेंट सी. एन. देशपांडे, जनरल मॅनेजर एन. एम. बंडगर यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

      प्रारंभी सत्यजीत पवार व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. वैशाली पवार यांच्या हस्ते सत्यनारायण पूजा करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते वजनकाटा व गव्हाणपूजन करण्यात आले.

      याप्रसंगी बोलताना डॉ. सुरेश भोसले म्हणाले, गेल्या हंगामात जयवंत शुगर्सचे अतिशय चांगली कामगिरी करून शेतकऱ्यांचे हीत साधले आहे. या हंगामात कारखान्याने ७ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असून, अधिकारी आणि कामगारांच्या कृतिशील प्रयत्नातून हे उद्दिष्ट नक्कीच गाठले जाईल. उच्चांकी दराची परंपरा जयवंत शुगर्सने कायम जपली असून, गेल्या हंगामातील ऊसबिलाचा ३०० रुपयांचा अंतिम हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केल्यामुळे गेल्या हंगामातील ३०५० रुपये इतकी संपूर्ण एफ.आर.पी. रक्कम कारखान्याने अदा करून शेतकऱ्यांचे हित साधले आहे.

      यावेळी जयवंत शुगर्सचे उपसरव्यवस्थापक आर.आर. इजाते, चिफ केमिस्ट जी. व्ही. हराळे, सिव्हिल इंजिनिअर एस.एच. शेख, केन ममॅनेजर नाथाजी कदम, चिफ अकौटंट आर.के. चन्ने, पर्चेस मॅनेजर व्ही.व्ही. थोरात, इरिगेशन इंजिनिअर आर. एस. नलवडे, प्रशासकीय अधिकारी आर.टी. सिरसाट, ई.डी.पी. मॅनेजर ए.एल. काशीद, मुख्य शेतकरी अधिकारी आर.जे पाटील, मनुष्यबळ विकास अधिकारी संजय भुसनर, पर्चेस ऑफिसर पी.एस. जाधव, इन्स्ट्रुमेंट मॅनेजर ए.बी. खटके, डिस्रमुख व्ही.जी. म्हसवडे, सुरक्षा अधिकारी जालिंदर यादव, केनयार्ड सुपरवायझर एस. एम. सोमदे, ए. एम. गोरे यांच्यासह कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते.