जिल्हा बँकेसाठी सोसायटी मतदारसंघातून अँड. उदयसिंह पाटलांचा अर्ज

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी सोमवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी कराड सोसायटी मतदारसंघातून अँड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी मनोहर माळी यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

जिल्हा बँकेसाठी सोसायटी मतदारसंघातून अँड. उदयसिंह पाटलांचा अर्ज
सातारा : निवडणूक निर्णय अधिकारी मनोहर माळी यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर करताना अँड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, सोबत इतर मान्यवर.

जिल्हा बँकेसाठी सोसायटी मतदारसंघातून अँड. उदयसिंह पाटलांचा अर्ज

जिल्हा बँक सार्वत्रिक निवडणूक : पहिल्याच दिवशी अर्ज दाखल 

कराड/प्रतिनिधी :

     सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून सोमवारी 18 रोजी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली. अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी कराड सोसायटी मतदारसंघातून अँड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी मनोहर माळी यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

     स्व. यशवंतराव चव्हाण, स्व. आबासाहेब वीर यांच्या मार्गदर्शनाखाली १९६७ साली  कराड सोसायटी मतदारसंघातून माजी सहकारमंत्री विलासराव पाटील-उंडाळकर (काका) यांनी जिल्हा बँकेत प्रवेश केला. सलग ११ वेळा याच मतदारसंघातून काका बँकेत संचालक राहिले. त्यांनी बँकेचे उपाध्यक्ष, अध्यक्ष व मार्गदर्शक अशा भूमिका बजावत सातारा बँकेचा नावलौकिक देशभर वाढवला. तसेच स्व. चव्हाणसाहेब, स्व. आबासाहेब वीर यांनी घालून दिलेले आदर्श पुढे घेऊन जात बँकेच्या सर्वांगीण विकासात काकांनी मोलाचे योगदान दिले.

     दरम्यान, विलासकाका बँकेचे संचालक असतानाच ४ जानेवारी २०२० रोजी त्याचे निधन झाले. त्यामुळे काकांच्या जागेवर त्यांचे सुपुत्र उदयसिंह पाटील यांची नियुक्ती सर्वानुमते ठरली. मात्र, तोपर्यंत बँकेची निवडणूक जाहीर झाल्याने काकांचा वारसा राजकारण, तसेच समाजकारणाबरोबरच सहकार चालवण्यासाठी अँड. उदयसिंह पाटील यांनीच काकांच्या जागेवर निवडणूक लढवावी, असा आग्रह कराड तालुक्याबरोबर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील नेतेमंडळी, कार्यकर्त्यांनी धरला होता.

     त्यानुसार अँड. उदयसिंह पाटील यांनी वरिष्ठ नेतेमंडळींच्या सल्ल्याने व  कराड सोसायटी मतदारसंघातील मतदारांशी चर्चा करून उमेदवारी निश्चित केली होती. त्यांनतर आज सोमवारी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा सार्वत्रिक निवडणूकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी अर्ज दाखल करत विलासकाकांचा वारसा व सेवा सोसायट्यांशी असलेली बांधीलकी जोपसण्यासाठी अँड. उदयसिंह पाटील सज्ज झाले आहेत.