कराड दक्षिण-उत्तरेसाठी पहिल्या दिवशी 60 अर्ज नेले

कराड दक्षिण-उत्तरेसाठी पहिल्या दिवशी 60 अर्ज नेले

कराड/प्रतिनिधी : 

                        राज्यात निवडणूक आयोगाने होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता व निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार शुक्रवारी 28 रोजीपासून प्रत्यक्ष अर्ज नेण्यास सुरुवात झाली आहे. त्यानुसार अर्ज नेण्याच्या पहिल्या दिवशी कराड दक्षिण व कराड उत्तर मतदारसंघातून एकूण 60 अर्ज नेले आहेत. परंतु, त्यापैकी अजून एकही अर्ज दिवसखेर दाखल झाला नाही. 

                      विधानसभा निवडणुकीसाठी 21 ऑक्टोंबर रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. तर 24 ऑक्‍टोबरला मतमोजणी व निवडणूक निकाल जाहीर होणार आहेत. त्यानुसार शुक्रवारी 28 रोजी अर्ज नेण्याच्या पहिल्या दिवशी कराड दक्षिण मतदारसंघात 21 जणांनी 37 नेले आहेत. तर कराड उत्तर मतदारसंघात 11 जणांनी 23 अर्ज नेले आहेत. परंतु, त्यापैकी अजून एकही अर्ज दिवसखेर दाखल झाला नाही.