कराड दक्षिणची मुलुखमैदान तोफ कालवश

कराड दक्षिण मतदारसंघाच्या राजकीय पटलावर मुलुखमैदान तोफ अशी ओळख असलेले गोळेश्वरचे ज्येष्ठ नेते पैलवान शिवाजीराव जाधव यांचे आज बुधवारी 13 रोजी पुणे येथे उपचारादरम्यान निधन झाले. गुरुवारी 14 रोजी सकाळी गोळेश्वर येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

कराड दक्षिणची मुलुखमैदान तोफ कालवश
ज्येष्ठ नेते पैलवान शिवाजीराव जाधव

कराड दक्षिणची मुलुखमैदान तोफ कालवश 

पैलवान शिवाजीराव जाधव यांचे निधन 

कराड/प्रतिनिधी : 

           कराड दक्षिण मतदारसंघासह तालुका व जिल्ह्याच्या राजकीय पटलावर 'मुलुखमैदान तोफ' अशी ख्याती असलेले गोळेश्वर ता. कराड गावचे माजी सरपंच, माजी जि. प. सदस्य पैलवान शिवाजीराव पांडूरंग जाधव (वय ७५) यांचे आज बुधवारी 13 रोजी पुणे येथे उपचारादरम्यान निधन झाले. 

          पै. शिवाजीराव जाधव हे स्व. विलासराव पाटील-उंडाळकर (काका) यांचे तब्बल ५० वर्षे राजकीय सहकारी होते. या काळात त्यांनी विविध निवडणुकांमध्ये राजकीय सभा गाजवल्या होत्या. तसेच कराड दक्षिण मतदार संघात त्यांच्या नावाला वलय व मोठा दबदबा होता. गोळेश्वरचे माजी सरपंच संतोष जाधव यांचे ते वडील होत. 

         पैलवान शिवाजीराव जाधव यांनी कराड शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती, तसेच कृष्णा सह. साखर कारखान्याचे तज्ज्ञ संचालक म्हणून काम पाहिले होते. ते माजी मंत्री स्व. विलासराव पाटील-उंडाळकर यांचे तब्बल ५० वर्षे राजकीय सहकारी होते. अलिकडील काही वर्षात य. मो. कृष्णा सहकारी साखर  कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांचे ते निकटवर्तीय होते. त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून पुणे येथे हृदयविकाराचे उपचार सुरु होते. बुधवारी उपचारादरम्यान त्यांचे  निधन झाले. त्यांच्या निधनाने गोळेश्वरसह कराड दक्षिण विभागात शोककळा पसरली आहे. गुरुवारी 14 रोजी सकाळी गोळेश्वर येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.