प्रचलित शिक्षण पद्धती बरोबर डिजिटल शिक्षण पद्धती अध्ययन अध्यापनाचे अविभाज्य अंग :- डॉ.बी.एम. हिर्डेकर

प्रचलित शिक्षण पद्धती बरोबर डिजिटल शिक्षण पद्धती अध्ययन अध्यापनाचे अविभाज्य अंग :- डॉ.बी.एम. हिर्डेकर

नवीन शैक्षणिक धोरण आणि उच्च शिक्षण यांची सांगड घालत असताना अध्ययन-अध्यापन निरंतर कसे चालेल व अध्ययन अध्यापनात विद्यार्थी प्राध्यापक शैक्षणिक संकुले विद्यापीठ व शासन आणि समाज या सर्वांची नाळ एकत्र जोडणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन डॉक्टर बी. एम. हिर्डेकर यांनी शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय, कराड यांचे वतीने आयोजित "नवीन शैक्षणिक धोरण आणि उच्च शिक्षण" या विषयावरील राज्य स्तरीय वेबिनार मध्ये  व्यक्त केले. ते पुढे म्हणाले कि आपल्या देशात परंपरागत शिक्षण पद्धती पूर्वापार चालत आलेली आहे. फार पूर्वीच्या काळी गुरुकुल पद्धती अस्तित्वात होती. या शिक्षण पद्धतीमध्ये हे विद्यार्थी गुरूगृही जाऊन शिक्षण घेत. अठरा विद्या व चौसष्ट कला अवगत करीत. अगदी या शिक्षण पद्धती सारखेच विद्यार्थ्यांना जे हवे ते ते शिक्षण मिळेल हे या नवीन शैक्षणिक धोरणात अपेक्षित आहे. यामध्ये हे शिक्षणाचे जे प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक महाविद्यालय व पदव्युत्तर शिक्षण याचा समावेश होतो. या प्रचलित शिक्षण पद्धतीमध्ये बदल होणे अपेक्षित आहे. शिक्षण पद्धती विद्यार्थी केंद्रित असली पाहिजे. विद्यार्थ्यांना जे शिकायला आवडेल ते शिकायला मिळाले पाहिजे. यासाठी चार भिंतीच्या आतील  फक्त खडू-फळा च्या साह्याने शिकवणारे यापेक्षा समाजात विद्यार्थी कुठेही राहत असला तरी त्या विद्यार्थ्याला डिजिटल पद्धतीने शिकवता आले पाहिजे . यासाठी शिक्षणाची आधुनिक तंत्रे शिक्षकाने अवगत केली पाहिजेत . एकविसाव्या शतकाची वाटचाल करत असताना परंपरागत शिक्षण पद्धतीत अडकून पडलेल्या शिक्षकांसमोर जन्मास येणाऱ्या डिजिटल युगातील बालकाला शिक्षण देणे एक मोठे आव्हान आहे . यासाठी  शिक्षकाने आवश्यक ते बदल स्वतःमध्ये करणे आवश्यक आहे. आधुनिक तंत्रे यामध्ये  गूगल क्लासरूम, युट्युब लिंक,  वेबिनार , व्हिडिओ कॉन्फरन्स, व्हाट्सअप ,इत्यादी अनेक साधनांचा वापर करून विद्यार्थ्या पर्यंत पोहोचले तर अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ होऊ शकते व यातूनच विद्यार्थी विकास साधू शकतात. कोणताही विद्यार्थी ज्ञानार्जन करण्यास  मुकणार नाही .  विद्यार्थी वर्गात शारीरिक दृष्ट्या हजर नसला तरीही इंटरनेटच्या माध्यमातून तो शिक्षकांशी व शाळेची जोडला गेला तर त्याला जगाच्या पाठीवर हवे ते शिक्षण मिळू शकते . यापुढे ते म्हणाले की शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे यांचे शैक्षणिक योगदान मोठे आहे ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार या सूत्रानुसार बापूजींनी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची निर्मिती केली आज बापुजिंच्या या सूत्राची नक्कीच एकविसाव्या शतकामध्ये येणाऱ्या तरुण पिढीला गरज निर्माण झाली आहे. ज्ञान-विज्ञान बरोबर सुसंस्काराची जोड मिळाली तर विद्यार्थी या देशाचा एक सक्षम नागरिक होऊ शकतो हे वास्तव सत्य आहे.
नवीन शैक्षणिक धोरण व उच्च शिक्षण या वेबिनार चे  बीजभाषक म्हणून श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे अर्थ सहसचिव सन्माननीय प्राचार्य डॉक्टर राजेंद्र शेजवळ आपल्या मार्गदर्शनात म्हणाले एकविसाव्या शतकात शासनाच्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार उच्च शिक्षणातील सर्वच घटकांना सर्व सर्व प्रकारचे तंत्रज्ञान अवगत करता आले पाहिजे. चार भिंतीच्या आतील शिक्षक हा आधुनिक तंत्रज्ञानाने सक्षम असेल तर नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थी व शिक्षण संस्था यामधील तो दुवा ठरेल आणि यामुळेच अध्ययन-अध्यापन सुलभ होईल. आज महाविद्यालयीन शिक्षण शिक्षणापुढे अनेक आव्हाने उभी आहेत. या आव्हानाना तोंड देत असताना डिजिटल शिक्षण पद्धती अंगीकारली पाहिजे. कारण आज ती काळाची गरज आहे जो यामध्ये पाठीमागे राहील त्याचे भविष्य अंधकारमय आहे. परंतु शिक्षकाने आधुनिक तंत्रज्ञानामध्ये विविध साधने अवगत केली व या साधनांच्या साह्याने विद्यार्थ्यापर्यंत पोहोचले तर नक्कीच या अंधकारातून प्रकाशाकडे जाण्याची वाट मिळेल. आणि या वाटेने आधुनिक जगात शैक्षणिक यश संपादन करता येईल . आज ज्ञानाचे दरवाजे इंटरनेटच्या माध्यमातून खुले झालेले आहेत. शिक्षकाने आज ज्ञानपिपासू होणे अपेक्षित आहे. माहितीचा खजाना मिळवून तो आपल्या विद्यार्थ्याला कसा देता येईल येईल याचा विचार सतत शिक्षकाने केला तर तो खडू-फळा यातून डिजिटल पद्धतीचे आव्हान स्वीकारण्यास तयार होईल. येणाऱ्या काळात या डिजिटल पद्धतींचे अनुकरण करणे प्रत्येक शिक्षकाचे कर्तव्य आहे. विद्यार्थ्यांचा डिजिटल वापर पाहता त्यांना ज्ञान देणाऱ्या शिक्षकांना देखील हे डिजिटल ज्ञान घेऊन विद्यार्थ्या पर्यंत पोहोचवता आले पाहिजे. म्हणजे संगणक साक्षरता तर महत्त्वाची आहे. पण या साक्षरतेचा कृतिशील घटक म्हणून शिक्षकाने काम करणे अपेक्षित आहे. यापुढे ते म्हणाले शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयाचे प्राचार्य व सर्व गुरुदेव कार्यकर्ते यांनी कोरोना रोगाच्या प्रादुर्भावाच्या कालखंडात चांगल्या पद्धतीचे नियोजन करून डिजिटल पद्धतीने अध्ययन अध्यापन प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. संस्थेच्या दृष्टिकोनातून महाविद्यालयाच्या दृष्टिकोनातून ही एक स्तुत्य बाब आहे.
या वेबिनार चे प्रास्ताविक करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुभाष शेळके यांनी लॉक डाऊन काळात महाविद्यालयात चालणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. त्याच बरोबर हा वेबिनार विद्यार्थी प्राध्यापक व समाज या दृष्टीने कसा महत्त्वाचा आहे हे सांगितले . त्याबरोबरच येणाऱ्या काळात आमचे महाविद्यालय डिजिटल अभ्यास पद्धतीने परिपूर्ण कसे होईल याचेही विवेचन केले व नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थी शिक्षक-पालक संस्था महाविद्यालय हे परस्पराशी जोडण्याचा आमचा प्रयत्न असेल असे प्रतिपादन केले.

 या वेबिनार मध्ये समन्वयक म्हणून प्राध्यापक सचिन बोलाईकर यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली व या वेबिनार चे ऑर्गनाईजिंग सेक्रेटरी प्राध्यापक सुरेश काकडे यांनी आभार व्यक्त केले. तसेच प्रसाद शेळके  यांनी  या वेबिनार च्या  सर्व तांत्रिक बाबी हाताळल्या  व वेबिनार  घडवून आणण्यास  मोलाची मदत केली.  सूत्रसंचालन प्राध्यापक सुभाष कांबळे यांनी केले या वेबिनार मध्ये जवळजवळ 125 मान्यवर सहभागी होते महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक प्राध्यापिका विद्यार्थी शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी हा वेबिनार यशस्वी करण्यामध्ये सहकार्य केले