माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबांना आयकरची नोटीस

नितीशकुमारांची कारकीर्द,संपविण्याचा भाजपचा डाव

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबांना आयकरची नोटीस

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराजबाबांना आयकरची नोटीस,माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची माहिती

नितीशकुमारांची कारकीर्द
संपविण्याचा भाजपचा डाव


कराड/प्रतिनिधीः-


राज्याचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांना आयकर विभागाने नोटीस बजावली आहे. त्यांच्याकडे संपत्तीचे मागील दहा वर्षांतीलविवरण मागण्यात आले आहे, अशी माहिती त्यांनी स्वतः पत्रकारांशी सवांद साधताना दिली. दरम्यान, बिहारच्या निवडणुकीत चिराग पासवान यांना भाजपाने
खतपाणी घालून नितीशकुमारांंची कारकिर्द संपवण्यात त्यांना यश आले आहे.नितीशकुमार मुख्यमंत्री झाले असले तरी ते अल्पमतातील मुख्यमंत्री असल्याने तेथील कारभार नियुक्त केलेले दोन उपमुख्यमंत्रीच पाहतील. काही कालखंडानंतर तेथे बदल होवू शकतो, असा गौफ्यस्पोट त्यांंनी केला.दिवाळी फराळानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री
पृथ्वीराज चव्हाण हे पत्रकारांशी संवाद साधत होते. त्यावेळी बोलताना त्यांनी मला ऐन दिवाळीतच आयकर विभागाकडून नोटीस पाठविण्यात आली आहे. या
नोटीसीमध्ये निवडणुकीत दिलेले प्रतिज्ञापत्र आणि गत दहा वर्षातील विवरण मागण्यात आले आहे. नोटीस पाठवून षडयंत्र करण्यामध्ये भाजपा माहिर आहे.
यापुर्वी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनाही ईडीची नोटीस पाठवून असा प्रकार करण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र त्यांना ही नोटीस मागे घ्यावी लागली. मीही या नोटीसीला कायदेशीर उत्तर देणार आहे. नोटीस रूपाने मला
दिवाळीच्या शुभेच्छाच दिल्या आहेत. या नोटिशीला 21 दिवसांत उत्तर द्यायचं असून प्रत्यक्ष हजर राहण्यासही सांगण्यात आले आहे. त्यादृष्टीने आम्ही योग्य ती कार्यवाही करत आहोत, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले. ही नोटीस म्हणजे आयकर विभागाच्या नियमित प्रक्रियेचा भाग असल्याचे नमूद करतानाच
चव्हाण यांनी यावेळी केंद्रातील भाजप सरकारलाही लक्ष्य केले.शरद पवार यांना बजावण्यात आलेल्या नोटीसवर बोट ठेवत चव्हाण यांनी भाजपच्या कार्यपद्धतीवर आपले परखड मत व्यक्त केले. सत्तेचा वापर कसा करायचा?, तो कोणासाठी करायचा?, याबाबत भाजपने नियोजनबद्धपणे व्यूहरचना
केली आहे. त्यानुसार सगळं काही सुरू असतं. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांना अशीच नोटीस आली होती आणि आता मला नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यावर योग्यते स्पष्टीकरण मी देणारच आहे, असे चव्हाण यांनी सांगितले.


केंद्रातील मोदी सरकार व भाजपला तुम्ही सातत्याने लक्ष्य करत आहात.यामुळे आपणास ही नोटीस पाठवण्यात आली आहे का? असे विचारले असता तसे काही असेल असे मला वाटत नाही मात्र, सत्तेचा वापर कसा करायचा हे भाजपला चांगलं माहीत आहे, इतकेच मी म्हणेन.बिहारच्या निवडणुकीत भाजपाने नितीशकुमार यांचे खच्चीकरण केले का? असे
विचारले असता ते म्हणाले, चिराग पासवान यांना पुढे करून भाजपाने त्यांना सर्व ताकद दिली. त्यामुळे जेडीयुच्या 35 ते 40 सिट्स पराभूत झाल्या.
नितीशकुमारांचे खच्चीकरण करणे हा एक कलमी कार्यक्रम चिराग पासवान यांनी हाती घेतला होता. त्याला भाजपाने सहकार्य केले म्हणूनच नितीशकुमार यांचे
खच्चीकरण झाल्याचे पहायला मिळत आहे. जरी नितीशकुमार मंत्री झाले असले तरी ते अल्पमतातील मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या मंत्रीमंडळात दोन
उपमुख्यमंत्री करून भाजप सत्ता चालवणार आहे. त्यामुळे याठिकाणी लवकरच पुन्हा फेरबदल झाल्याचे पहायला मिळेल. बिहारच्या निवडणुकीत काँग्रेसची
कामगिरी निराशाजनक झाली आहे. एमआयएमला याठिकाणी यश आले आहे, असे म्हणण्यापेक्षा आपली ताकद वाढवणे गरजेचे आहे. तेजस्वी यादव यांचा आरजेडी हा सर्वात मोठा पक्ष असून उत्तर भारतामध्ये हे नेतृत्व चांगले कामकाज करू शकते.


बिहारच्या निवडणुकीनंतर कॉग्रेस पक्ष नेतृत्वावर पुन्हा कलह निर्माण झाला आहे. यावर बोलताना ते म्हणाले, काँग्रेस पक्षांतर्गत काही बदल करण्यात यावेत असे आम्ही सुचवले होते. पण त्या पत्राचा विपर्यास झाला आणि नाहक नको ती चर्चा झाली. खरेतर राहुल गांधी हा एकमेव चेहरा आमच्या पक्षाकडे सुपरिचित आहे. त्यांनी आपला राजीनामा पाठीमागे घ्यावा आणि अध्यक्षपदाची
धुरा पुर्णवेळ सांभाळाची अशी आमची मागणी आहे. अद्यापही त्यांनी याबाबत कोणता निर्णय घेतलेला नाही. मात्र, सध्याच्या अध्यक्ष म्हणून सोनिया गांधी कामकाज पाहत आहेत. त्या या संदर्भात योग्य तो निर्णय घेतील आणि त्यादृष्टीने त्यांची वाटचाल सुरू आहे, त्यामुळे पक्षाला लवकरच पुर्णवेळ अध्यक्ष लाभेल अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.शरद पवार यांना ईडीने नोटीस बजावली होती. ती नोटीस त्यांना मागे घ्यावी
लागली. मला नोटीस आली आहे. त्याची माहिती मी कायदेशीररित्या देणार आहे.अशा नोटीसा येत असतात. याला फारसे महत्व नाही. असेही त्यांनी यावेळी
स्पष्ट केले.