कराडचा जनाधार राज्याचा समजून विधानभवनावर झेंडा फडकविणार - देवेंद्र फडणवीस

कराडचा जनाधार राज्याचा समजून विधानभवनावर झेंडा फडकविणार - देवेंद्र फडणवीस

कराड/प्रतिनिधी : 

                         महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास आम्ही केला असून आता आपल्याला सातारा जिल्ह्यात पतीवर्तन घडवायचे आहे.  उदयनराजे आपल्याकडे आल्याने आपली ताकद वाढली असून डॉ. अतुल बाबांच्या पाठीशी आता महाराजांची फौज उभी आहे. त्यामुळे आता अतुलबाबांना पांडुरंगाचा आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहणार नाही. अतुलबाबांना, भाजपला साथ देणार का? अशी जनतेला साद घालत कराडचा जनाधार हा महाराष्ट्राचा जनाधार समजून मुंबईत विधानभवनावर झेंडा फडकविणार असल्याचा ठाम विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

                       कराड येथे महाजनादेश यात्रेदरम्यान येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर रविवारी 15 रोजी सायंकाळी  आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटीलजलसंपदा मंत्री गिरीष महाजनमाजी खासदार उदयनराजे भोसलेमाजी आमदार जयकुमार गोरेमाथाडी नेते नरेंद्र पाटीलकृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसलेपंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसलेराज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष ना. शेखर चारेगावकरजिल्हाध्यक्ष विक्रम पावसकरनगराध्यक्षा रोहिणी शिंदेउपनगराध्यक्ष जयवंतराव पाटीलशहराध्यक्ष एकनाथ बागडीराजाभाऊ देशपांडेसारिका गावडे आदींची उपस्थिती होती.