कराड जनता बँकेच्या ठेवीदारांना दिलासा

३२९.७६ कोटी रुपये DICGC कडून मंजूर

कराड जनता बँकेच्या ठेवीदारांना दिलासा

कराड जनता बँकेच्या ठेवीदारांना दिलासा

३२९.७६ कोटी रुपये DICGC कडून मंजूर

कराड / प्रतिनिधी


कराड जनता बँकेच्या ठेवीदारांसाठी 'निक्षेप बीमा और गॅरंटी निगम' कडून ३२९.७६ रुपये दि.२२ एप्रिल रोजी मंजूर केले असून याबाबतची माहिती बँकेचे अवसायक मनोहर माळी यांनी दिली आहे.

५ लाखांचा आतील ठेवीदारांनी खाते नंबर,मोबाईल नंबर आणि पत्त्याचा पुरावा इत्यादी केवायसी सादर करण्याचे सदरच्या पत्रात उल्लेखित केले आहे.यामुळे ठेवीदारांच्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.कराड जनता बँक अडचणीत आल्यानंतर सर्वसामान्य ठेवीदारांचे काय होणार असा प्रश्न निर्माण झाला होता.परंतु DICGC च्या आदेशामुळे ठेवीदारांच्यातून समाधान व्यक्त होत असून कोरोना महामारीच्या काळात दिलासा मिळाला आहे.