कृष्णेच्या निवडणुकीसाठी राजकीय खलबत्ते पण ‘एकमत’ नाही

ग्रामविकासमंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची अडचण ... जयंत पाटील कोणाच्या पारड्यात वजन खर्च करणार हे पहावे लागेल.

कृष्णेच्या निवडणुकीसाठी राजकीय खलबत्ते पण ‘एकमत’ नाही

कृष्णेच्या निवडणुकीसाठी राजकीय खलबत्ते पण ‘एकमत’ नाही


कराड/प्रतिनिधीः-


यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणुकजाहिर होण्याआधीच इच्छुक असलेल्या पार्टीप्रमुखांनी बैठकांचा जोर सुरू ठेवत सभासदांशी संपर्क अभियान राबवत आहेत. सध्या कारखान्यात सत्तेवर असलेले डॉ. सुरेश भोसले यांनी संपर्क अभियानात अद्याप सुरूवात केली नसली तरी त्यांचे पुत्र व भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांनी मात्र सभासदांशी संपर्क साधण्याची मोहिम हाती घेतली आहे. तर माजी चेअरमन डॉ. इंद्रजित मोहिते आणि अविनाश मोहिते यांनीही सभासदांशी संपर्कसुरू ठेवला आहे. निवडणुक दुरंगी होणार की तिरंगी यावर खलबत्ते सुरू आहेत.

मुंबईतल्या बैठकीत एकमत झाले नसलेचे माहिती हाती आली आहे. त्यामुळे प्रत्येकाने जर एकला चलोचा नारा दिला तर कृष्णेची निवडणुक तिरंगी होणार अशी सध्या परिस्थती दिसत आहे. वरिष्ठ नेत्यांनी याबाबत हालचाली सुरू केल्या असून दोन महितेंना एकत्रित आणण्यावर राजकीय दबाव वाढत आहे. यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची गत निवडणुक ही तिरंगी झाली आणि कृष्णेचे सहकार पॅनेल सत्तेवर आले. हे जरी खरे असले तरी कृष्णेच्या इतिहासात पहिल्यांदा दुसर्‍या पॅनेलचे संचालक निवडुण येण्याची किमया घडली आणि माजी चेअरमन अविनाश मोहिते यांच्या नेतृत्वाखालील संस्थापक पॅनेलचे सहा सदस्य संचालक झाले. यामध्ये सर्वाधिक मते घेवून अविनाश मोहिते विजयी झाले परंतू त्यांना सत्ता सोडून विरोधात बसावे लागले.

कृष्णेत सध्या बरीच खलबत्ते सुरू आहेत. राजकीय चर्चांना उधाण आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही निवडणुक जूनमध्ये होण्याऐवजी आत्तापर्यंत पुढे ढकलली गेली आहे. निवडणुक व्हावी म्हणून न्यायालयीन लढाही झाला आहे.मतदार याद्या मागवण्याचे काम सुरू झाले आहे. मात्र प्रत्यक्षात निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहिर झालेला नाही. सहकार खात्याने 31 मार्चपर्यंत सर्व निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. कृष्णेची निवडणुक होणार असा कयास मात्र बांधला जात आहे. कृष्णेच्या निवडणुकीकडे पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. गत निवडणुकीत सहकार पॅनेलबरोबर असलेले उंडाळकर गट सध्या त्रयस्तच्या भुमिकेत आहेत. अशातच या निवडणुकीत उंडाळकर गटाचे नेतृत्व उदयसिंह पाटील यांच्याकडे आले आहे. त्यामुळे त्यांची मानसिकता सध्यस्थितीत काँग्रेस ज्याच्या पाठीशी त्याच्याबरोबर आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना विधानसभेच्या निवडणुकीत डॉ. इंद्रजित मोहिते आणि अविनाश मोहिते यांनी मदत केली होती. किंबहुना त्यांनी प्रचारात हिरीरीने सहभाग घेतला होता. बाबंची सद्यस्थिती इकडे आड तिकडे विहिर अशी आहे. बाबांनी जर एखाद्याला पाठिंबा दिला तर दुसरा नाराज होणार आहे. त्यामुळे मेळ घालण्यावरच त्यांचा व त्यांच्या गटाचा भर आहे.

बाबांच्या विरोधात भाजपाकडून लढलेले अतुलबाबा यांनी कृष्णेच्या निवडणुकीत एकला चलोचा नारा देत प्रचारात रणनिती  आखावयास सुरूवात केली आहे. हे जरी खरे असले तरी या निवडणुकीत खरी अडचण होणार आहे ती सध्याचे ग्रामविकासमंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची... जयंत पाटील कोणाच्या पारड्यात वजन खर्च करणार हे पहावे लागेल. त्यांनी यापुर्वी अनेकवेळा भोसलेंच्या सहकार पॅनेलला मदत केली आहे. मात्र, आता ती त्यांना उघड करणे अवघड आहे. कारण कृष्णा सध्या भाजपच्या नेतृत्वाच्या ताब्यात आहे आणि राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आहे. शरद पवार आणि जयंत पाटील यांनी ठरवले तरच डॉ. इंद्रजित मोहिते व अविनाश मोहिते एकत्रित येवू शकतात. अद्याप याबाबत कोणीही भाष्य केलेले नाही. जिल्ह्यातील भाजपच्या ताब्यात असलेला हा महत्वाचा कारखाना त्यांच्याकडून काढून घेण्यासाठी महावकास आघाडीचा पॅटर्न राबवला जातो की काय? अशी चर्चाही सध्या सुरू आहे. राजकीय खलबत्ते सुरू झाली आहेत. मुंबईत काँगे्रसअंतर्गत एक बैठकही पार पडली आहे.या बैठकीचा सुर आणि ताल मात्र जुळलेला नाही. पृथ्वीराजबाबांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत प्रत्येकाने आपआपली मते मांडली असली तरी एकमत होण्याची शक्यता दिसत नाही.