जयवंत व्हा... यशवंत व्हा !

जयवंत व्हा... यशवंत व्हा !

जयवंत व्हा... यशवंत व्हा !


कृष्णाकाठ गुण्या गोविंदांने नांदत होता. शेतकरी सभासद जयवंत व्हा.. यशवंत व्हा... असे गित गात होता. भाऊ-अप्पांची जोडी सर्व महाराष्ट्रभर परिचित होती याला नजर लागली. 1987 च्या मध्यावर भाऊंनी कारखान्याच्या कारभारासंदर्भात काही शेतकर्‍यांनी मुद्दे उपस्थित केले आणि इथे संघर्ष सुरु झाला. सख्खे भाऊ एकमेंकावर आरोप करु लागले. याची ठिणगी 1988 च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पडली. सर्व सभास्थळी जमलेले  शेतकरी सभासद सैरभैर झाले. मिळेल त्या रस्त्याने पळू लागले. लाठ्या काठ्यांचा मार काही सभासदांना खावा लागला. कृष्णाकाठी  हे करुक्षेत्र खर्‍या अर्थाने सुरु झाले.


1988च्या वार्षिक सर्वसाधारण सभेपुर्वी रेठरे येथील भाऊ-अप्पा हे बंधू गुण्या गोविंदाने आपआपल्या प्रयत्नातून राजकिय क्षेत्रात काम करत होते. भाऊ राज्य व देशपातळीच्या राजकारणात असल्याने त्यांचा मोठा दबदबा होता. राज्यातील बहुतांशी महत्वाचे निर्णय हे भाऊंनी आपल्या मंत्रीपदाच्या कारकिर्दीत घेतले. कृष्णा कारखान्याची निर्मिती केल्यापासून आपले धाकटे बंधू जयवंतराव अप्पा यांच्यांकडे त्यांनी कारखान्याची धुरा सोपविली होती. भाऊ राज्याच्या राजकारणात असल्याने त्यांनी कधी कारखान्याच्या कारभारात लक्ष घातले नाही. तब्बल 30 वर्षे चेअरमन म्हणून अप्पानी काम पाहिले. त्यांनी कारखान्याच्या मोठ्या प्रमाणात प्रगती केली. शासन स्तरावर जी मदत लागेल. ती मदत भाऊ या कारखान्यासाठी करत राहिले. अप्पांनी हि ज्या माळावर कुसळे उगवत होते तेथे पाण्याच्या स्किम तयार करुन पाणी नेले आणि हरितक्रांती घडविण्याचे काम केले. अप्पांच्या कारभारावर भाऊंचा गाढा विश्वास होता. या कारखान्याच्या माध्यमातून अप्पांनी अनेक संस्था उभ्या केल्या. या पुरक संस्थाच्या माध्यमातून या भागाचा विकास व्हावा हा त्यांचा दूरदृष्टिकोन या भागाच्या विकासासाठी पुरक ठरला. कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट, ग्रामिण विकास विश्वस्त संघ, मयुर कुकुटपालन सहकारी संस्था, पशु खाद्य निर्मिती कारखाना तसेच कृष्णी उद्योग संघ आणि या भागातील गोर-गरिब जनतेची सभासदांची व शेतकर्‍यांची मुले शिक्षणापासून वंचित राहु नये म्हणून शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ स्थापन करुन शिक्षणाची दारे खुली केली.


पत्रकारितेच्या ऐन उमेदीत काम करत असताना या दोन भावांमध्ये संघर्ष पहायला मिळाला. 1987 ला गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर महाराष्ट्राचे थोर विचारवंत यशवंतराव मोहिते भाऊ यांनी कारखान्यातील कारभारावर टिकास्त्र करत आपल्या सख्या भावाच्या विरोधात म्हणजे जयवंतराव भोसले  अप्पा यांच्याविरोधात रणशिंग फुकले. वाठार ता. कराड येथे पहिले जाहिर सभा घेऊन भाऊंनी भर पावसात हातात गुलाबाचे फुल घेत रणशिंग फुंकले. रयत संघर्ष मंचची स्थापना करत असल्याची घोषणा केली. या संघर्षाची नोंद राज्यस्तरावर अनेक प्रसारमाध्यमांनी घेतली याचे मथळेच्या मथळे छापून आले. ही सभा केल्यानंतर वृत्त कसे प्रसिद्ध करायचे या गोंधळात असताना अनेक माध्यमातून प्रसिद्ध झालेल्या बातम्यातून खुप काही शिकता आले. संघर्षाचा प्रारंभ इथे सुरु झाला आणि कृष्णाकाठ जयवंत व्हा.. यशवंत व्हा... हे गित विसरुन सख्खे भाऊ पक्के वैरी या विचारात गुफंला. कृष्णा कारखान्याचे रणशिंग या ठिकाणी फुंकल्यानंतर अनेक सभा झाल्या. 1988 वार्षिक सभा तर स्मरणात राहिल अशी होती. बातमी संकलन करण्यासाठी जमलेल्या माध्यम प्रतिनिधिंना मिळेल तो रस्ता पकडून पळावे लागले कारण ही तसेच होते. या सभास्थळी भाऊ आपल्या समर्थकांसह येत असल्याचे पाहिल्यानंतर अप्पांनी त्यांना गेटवर रोखा असा आदेश दिला. या सभेसाठी मोठा पोलिसफौजफाटा तयार करण्यात आला  होते. पण भाऊ आणि समर्थकांना पोलिसांना न जुमानता लावण्यात आलेली बॅरिकेट उपटत सभा स्थळावर कुच केली व संघर्ष सुरु झाला. पोलिसांनी लाठीचार्ज सुरु केला. पोलिसांचा मार आणि भाऊ-अप्पांची समर्थक एकमेकांना भिडल्याचे पहयला मिळाले अनेकांचे कपडे फाटले, चप्पला टाकून सभासद स्थळावरुन सैरभैर पळू लागले. पळणार्‍या सभांदांना पोलिसांचा लाठ्यांचा प्रसाद मिळाला. काही क्षणातच हि सभा गुंडाळली. अप्पा आणि संचालक मंडळ कारखान्याच्या ऑफिसकडे गेले मात्र सभास्थळाच्या बाहेर असणार्‍या मोकळ्या पटांगणात भाऊंनी प्रतिसभा घेतली इथेच सुरु झाले कृष्णाकाठचे कुरुक्षेत्र आणि याचे रुपांतर झाले 1989च्या निवडणुकीत....


क्रमशः