निवडणूक बाजार समितीची परीक्षा महाविकास आघाडीची

स्थानिक पातळीवर गळ्यात गळे वरिष्ठ पातळीवर आरोप प्रत्यारोप

निवडणूक बाजार समितीची परीक्षा महाविकास आघाडीची

शिवसेनेतील फूट,ईडी सीबीआयचे छापे आणि राहुल गांधींची खासदारकी रद्द करताना एकसंघपणे विरोध करणारी महाविकास आघाडी स्थानिक निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या गळ्यात गळे घालत असल्याची चर्चा कराड उत्तर मधील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे काही पदाधिकारी खाजगीत करत आहेत यामुळे सत्तेसाठी काहीही करताना वरिष्ठ पातळीवरील मोठे नेते विरोधासाठी नाममात्र बोलून नेमके काय साध्य करणार आहेत याबाबत साशंकता व्यक्त होत आहे.

 

कराड शेती उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लागली आहे,आघाडीचे घटक असलेले महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण व सातारा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आ.बाळासाहेब पाटील यांच्या गटाने अद्याप शिवसेना उ.बा. ठा.पक्षाच्या एकाही स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संपर्क केला नाही हे नवल वाटण्यासारखे नाही का ? म्हणजे त्यागाची भूमिका घ्यायची झाली की ती आम्ही घ्यायची हे आघाडी धर्माला साजेस आहे का ? का या स्थानिक नेत्यांच्या मनात दुसरच काहीतरी शिजतंय? भाजपचे अतुल भोसले व  राष्ट्रवादीचे बाळासाहेब पाटील एकत्र आणि काँगेसचे आ.पृथ्वीराज चव्हाण, उदयसिंह पाटील व भाजपाचे मनोज घोरपडे, धैर्यशील कदम एकत्र निवडणूक लढणार अश्या बातम्या समोर येतायत,अश्या बातम्याना आधार नसतो,परंतु असे नसावेच कारण आत्ताच काँग्रेस नेते राहुल गांधींची खासदारकी रद्द केली म्हणून लोकशाहीला घातक असणाऱ्या भाजपा विरोधी साताऱ्यात मोर्चा काढणारी काँग्रेस महाविकास आघाडी म्हणून एकसंघ  सर्वांना सोबत घेऊन लढणार का हाच प्रश्न जनतेच्या मनात राहणार आहे सोमवार पासून उमेदवारी अर्ज भरावयास सुरुवात होणार आहे,अजून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा नाही म्हणून मनात प्रश्न उभा राहिला.


सुनिल प्रकाश पाटील
उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा सैनिक

दडपशाहीच्या राजकीय भूमिकेमुळे देशाचे राजकीय वातावरण भाजपा विरोधी पक्षांनी ढवळून काढले आहे,लोकशाहीला मारक ठरणारी भूमिका भाजपा घेत असल्याची विविध राजकीय पक्षातील नेत्यांची विधाने कायमच चर्चेत येऊ लागली आहेत.याच्या विरोधात महाराष्ट्रात शिवसेना ठाकरे गट,राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रीय काँग्रेस यांनी महाविकास आघाडी करून विधान परिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदार संघ तसेच विधानसभेच्या पोट निवडणुकीला सामोरे जाताना दिसत आहेत,यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आघाडीचे नेतृत्व स्वीकारून प्रत्येक वेळी मतदार संघात समजूतदार पणा दाखऊन दिला आहे,उदाहरणच द्यायचं झालं तर,कोल्हापूर, कसबा व पिंपरीचिंचवड पोट निवडणूक ऐन वेळी नागपूर विधान परिषदेची जागा काँगेसला सोडून नाशिक पदवीधर मतदार संघाची जागा स्वीकारली असे असताना काही दिवसांपूर्वी झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना पक्षाचा आदेश पाळून महाविकास आघाडीसोबत राहून आघाडी धर्म पाळण्याचे आवाहन केले.वरिष्ठ पातळीवर नेते ऐकत्र आहेत असे त्यांच्या वागण्या बोलण्यातून तरी दिसत आहे,परंतु स्थानिक पातळीवर नेते एकमेकाला विचार घेतायत का ? असा प्रश्न गावपातळीवरील कार्यकर्त्यांना पडला आहे.