चोरे विभागातील कोरोनाबधित बातमीची आरोग्य राज्यमंत्री ना.राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी घेतली दखल

प्रीतिसंगमच्या ऑनलाईन बातमीची दखल

चोरे विभागातील कोरोनाबधित बातमीची आरोग्य राज्यमंत्री ना.राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी घेतली दखल

उंब्रज/प्रतिनिधी

कोल्हापूर व सातारा जिल्ह्याच्या कराड येथील आढावा बैठकीसाठी उपस्थित राहिलेले शिवसेनेचे आरोग्य राज्यमंत्री ना.राजेंद्र पाटील-यड्रावकर हे कराड मधील बैठकीला हजर राहिले होते. आढावा बैठक सुरू होण्यापूर्वी दै.प्रीतिसंगमने चोरे विभागातील 53 कोरोनाबधितची बातमी ऑनलाईनला रविवारी सकाळी प्रसिध्द केली होती.सदरची बातमी शिवसेना कराड उत्तरचे अध्यक्ष सुनील पाटील  ना.राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या निदर्शनास आणून दिली.

या बातमीची आरोग्य राज्यमंत्री ना.राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी तत्काळ दखल घेत जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा व कोविड रुग्ण यांच्या समस्या याविषयी संवाद साधला. कराड तालुक्यातील चोरे येथील 53 रुग्णसंख्या व इंदोली प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या कार्यक्षेत्रामध्ये असलेले एकूण 70 ऍक्टिव्ह रुग्ण या संदर्भामध्ये त्वरित इंदोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुजाता माने यांच्याशी संपर्क साधून आढावा घेतला, तसेच सातारा जिल्ह्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी संपर्क साधून, इंदोली प्राथमिक आरोग्य केंद्राला लागेल ते साहित्य उपलब्ध करण्याच्या सूचना आरोग्य राज्यमंत्री श्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केली.