टक्केवारी कोण घेतं ते कराडकरांना चांगलेच माहित..!

राजेंद्रसिहं यादव यांच्यावर विनायक पावसकर यांची टिका

टक्केवारी कोण घेतं ते कराडकरांना चांगलेच माहित..!

टक्केवारी कोण घेतं ते कराडकरांना चांगलेच माहित


राजेंद्रसिहं यादव यांच्यावर विनायक पावसकर यांची टिका

कराड/प्रतिनिधीः-


टक्केवारीचा आरोप करणार्‍यांचे उद्योग काय? टक्केवारी कोण घेते? कोण घेत नाही? त्यांचे सर्वच व्यवसाय टक्केवारीवर चालतात. त्यामुळे कराडकरांना चांगले माहिती आहे की टक्केवारी कोण घेतो. असा असा सवाल नगरसेवक राजेंद्रसिंह यादव यांचे नांव न घेता भाजपाचे जेष्ठ नगरसेवक विनायक पावसकर यांनी करतानाच ज्यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा चेहरा वापरून निवडणूक लढवली त्यांनी तिसर्‍या दिवशी त्यांना सोडले आज पर्यंत ज्या ज्या निवडणुका लढल्या त्या निवडणुकांचा निकाल लागताच तिसर्‍या दिवशी निवडणून येणार्‍याला सोडल्याचा इतिहास ज्यांचा आहे. त्यांनी आमच्याकडे बोट करण्यापेक्षा स्वतःचा अतृप्त आत्मा शहरासाठी काय काम करतो याचा विचार करावा. असा घनाघात आरोपही त्यांनी यावेळी केला. तर राज्यात आमची सत्ता असताना भाजप बरोबर आणि सत्ता बदलताच राजीनामा द्या असे म्हणेणे बालिशपणाचे वक्तव्य असल्याचे मत नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी केले.


कराड नगरपालिकेत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी विद्या पावसकर, सुहास जगताप, फारूक पटवेकर आदी उपस्थित होते.
विनाकय पावसकर म्हणाले, अतृप्त आत्मा माझ्यावर टीका केली. मात्र आमदारकीची स्वप्न पूर्ण होवू शकणार नाही. यांची कल्पना आलेली असल्याने ते अतृप्त केवळ नगरपालिकेला नाही तर गावाला त्रास देण्याचे काम करत आहेत. माझा अतृप्त आत्मा असा उल्लेख केला, मी तृप्त आहे. मी 35 वर्ष नगरसेवक तर 22 वर्ष स्थायी समितीत काम केले आहे. त्यामुळे तृप्त आहे.


पुढे पावसकर म्हणाले, नैतिकता हा शब्द त्यांच्या तोंडून शोभूच शकत नाही. नैतिकतने नगराध्याक्षांनी राजीनामा द्यावा असे विधान केले. तुमच्याकडे नैतिकता आहे का ते तापासून पहावे, पहिली पोटनिवडणूक आठवत असेल तर बघा. मागील नगरपालिकेच्या निवडणूकीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा आधार घेवून चेहरा, नांव घेवून तुमचे नगरसेवक निवडूण आले, तुम्ही नापास झाला. विकास कामासाठी निधी कसा मागायचा हे आम्हाला कळत नाही. अशी टिका करण्यात आली मात्र मागील चार वर्षात निधी आणून आम्ही कामे केली. माझे वय झाले असा आरोपही माझ्यावर करण्यात आला. कच्च्या लोणच्यापेक्षा मुरलेल लोणचच अधिक चांगले कारण ते अधिक चवदार असत. स्मार्ट सिटीबद्दलची वल्गना करून पोकळ घोषणा करायच्या लोकांची दिशाभूल करायची या शहरात पालकमंत्री , आमदार, खासदार आहेत पण, त्याही पेक्षा मी वेगळा आहे असे भासवून जे स्वतःच्या वार्डात नापास झाले आहेत ते स्मार्ट सिटीचे स्वप्न हे एक मालिका होती मुंगेरीलाल के हसीन सपने या प्रमाणे आहे. निवडणुकीसाठी किती हुशार आहोत हे दाखवण्याची केविलवाणी धडपड सध्या सुरू आहे.  


नगराध्यांक्षा रोहीणी शिंदे म्हणाल्या, भाजपची सत्ता असताना आमच्या बरोबर आणि सत्ता गेल्यानंतर विरोधात. उगवत्या सूर्याला नमस्कार करणारे, गुलाल तिकडे चागंभलं म्हणणारे सहकारी आमच्यावर टीका करत आहेत. त्यांनी गेल्या चार वर्षात टीका करत राजीनामा मागितला. मला जनतेने येथे बसवल आहे, त्यामुळे मी जनतेला बांधिल आहे. तेव्हा तुम्ही राजीनामा मागणं योग्य नाही. मी कोरोना काळात शहरात काम करत असताना फोटोसेशन करत होते, असा आरोप केला जात होता. तेव्हा तुम्ही कुठे होता, की जनतेने तुम्हांला सांगितले होते. तुम्ही येवू नका.