कराड नगरपालिकेतर्फे सायकल मॅरेथॉनचे आयोजन

कराड नगरपालिकेच्या वतीने माझी वसुंधरा अभियानांतर्गत दर शुक्रवारी सायकल डे उपक्रम राबविण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला. शुक्रवारी 18 रोजी या उपक्रमाचा सायकल रॅलीने शुभारंभही करण्यात आला. आता नगरपालिकेतर्फे वसुंधरा अभियानांतर्गतच सायकल वापरा...प्रदूषण टाळा हा संदेश देण्यासाठी भव्य सायकल मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे.

कराड नगरपालिकेतर्फे सायकल मॅरेथॉनचे आयोजन
कराड नगरपालिकेतर्फे सायकल मॅरेथॉनचे आयोजन 

कराड/प्रतिनिधी :

         येथील नगरपालिकेच्या वतीने माझी वसुंधरा अभियानांतर्गत दर शुक्रवारी सायकल डे उपक्रम राबविण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला. शुक्रवारी 18 रोजी या उपक्रमाचा सायकल रॅलीने शुभारंभही करण्यात आला. आता नगरपालिकेतर्फे वसुंधरा अभियानांतर्गतच सायकल वापरा...प्रदूषण टाळा हा संदेश देण्यासाठी भव्य सायकल मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे.

         सायकल वाचवूया अन् वसुंधरेला सक्षम बनवूया ! या आदर्शासह सायकल वापरा...प्रदूषण टाळा हा संदेश देण्यासाठी नगरपालिकेच्या वतीने सायकल मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. 3 जानेवारी 2021 रोजी ही स्पर्धा संपन्न होणार असून सकाळी 6 वाजता प्रीतिसंगमावरील यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीस्थळी सायकल मॅरेथॉनचा शुभारंभ करण्यात येणार आहे.

         सदर स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सर्व इच्छुक स्पर्धकांनी अतुल पाटील ए. पी. स्पोर्ट, कृष्णा नाका, कराड (9766323878) यांच्याशी संपर्क करावा. याचबरोबर मॅरेथॉन स्पर्धेस मोठ्या संख्येने उपस्थित राहून शहरातील सर्व नागरिकांनी आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहनही मुख्याधिकारी, नगरपालिकेतर्फे नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, उपनगराध्यक्ष जयवंतराव पाटील, सर्व समिती सभापती, नगरसेवक, नगरसेविका, व कर्मचाऱ्यांनी केले आहे.