कराड पालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी बनले दोन तासांचे मुख्याधिकारी

कराड नगरपालिकेचे कर्मचारी दत्तात्रय रामचंद्र गिजरे यांचा नुकताच सेवा निवृत्तीनिमित्त पालिकेत सत्कार करण्यात आला. मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी गिजरे यांना आपल्या खुर्चीत बसवून त्यांचा सेवानिवृत्तीनिमित्त अनोख्या पद्धतीने सन्मान केला. तसेच मुख्याधिकाऱ्यांनी त्यांना खुर्चीवर बसून दोन तास मुख्याधिकारी पदाचे कामकाज करण्याचीही संधी दिली. नायक चित्रपटाच्या कथानकाला साजेशा या कल्पनेची शहरात चांगलीच चर्चा रंगल्याचे दिसून आले.

कराड पालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी बनले दोन तासांचे मुख्याधिकारी
कराड : मुखाधिकाऱ्यांच्या खुर्चीत बसविलेले सेवानिवृत्त कर्मचारी दत्तात्रय गिजरे व मुख्याधिकारी रमाकांत डाके

कराड/प्रतिनिधी : 
           येथील नगरपालिकेचे कर्मचारी दत्तात्रय रामचंद्र गिजरे यांचा नुकताच सेवा निवृत्तीनिमित्त पालिकेत सत्कार करण्यात आला. मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी गिजरे यांना आपल्या खुर्चीत बसवून त्यांचा सेवानिवृत्तीनिमित्त अनोख्या पद्धतीने सन्मान केला. तसेच मुख्याधिकाऱ्यांनी त्यांना खुर्चीवर बसून दोन तास मुख्याधिकारी पदाचे कामकाज करण्याचीही संधी दिली. नायक  चित्रपटाच्या कथानकाला साजेशा या कल्पनेची शहरात चांगलीच चर्चा रंगल्याचे दिसून आले.
           दत्तात्रय गिजरे हे नगरपालिकेत चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून कार्यरत होते. गुरुवारी 30 रोजी ते वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. यानिमित्ताने मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी गिजरे यांना आपल्या कक्षात बोलावून घेत त्यांना थेट आपल्या खुर्चीवर बसण्याचा बहुमान दिला. अनपेक्षितपणे मुख्याधिकाऱ्यांच्या कडून मिळालेल्या या अनोख्या सन्मानाने दत्तात्रय गिरजे यांना गहिवरून आले. तसेच मुख्याधिकारी डाके यांनी गिजरे यांना आपल्या खुर्चीवर बसून दोन तास पालिकेचे कामकाज पाहण्याचीही संधी दिली. गिजरे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त मुख्याधिकाऱ्यांनी त्यांचा अनोख्या पद्धतीने केलेल्या सन्मानाने अन्य पालिका कर्मचारीही भारावले होते. 
          नगरपालिकेच्या आत्तापर्यंतच्या इतिहासात एखाद्या निवृत्त कर्मचाऱ्याचा प्रथमच असा सत्कार झाला. त्यामुळे या सत्काराची शहरात चांगलीच चर्चा रंगल्याचेही दिसून आले. दरम्यान, कराड नगरपरिषद संघटना व आस्थापना विभागातर्फे दत्तात्रय गजरे यांचा सन्मानचिन्ह व पोशाख देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी नगरपरिषदेचे कर्मचारी व विविध विभागाचे पदाधिकारी उपस्थित होते. 

नगरपालिका कर्मचारी दत्तात्रय गिजरे यांच्या सेवानिवृत्तीचा दिवस अविस्मरणीय व्हावा. तसेच त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा, यासाठी त्यांना मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसवून अनोख्या पद्धतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यापुढे नगरपालिकेत आपली सेवा बजावत सेवानिवृत्त होणाऱ्या प्रत्येक नगरपालिका कर्मचाऱ्याला पितळी स्वरुपात सन्मानपत्र देऊन गौरवण्यात येईल. 
           - मुख्याधिकारी रमाकांत डाके