कराड पालिकेत आता प्रत्येक शुक्रवारी सायकल डे उपक्रम

येथील नगरपालिकेत आता आठवडयातील प्रत्येक शुक्रवारी "सायकल डे" पाळण्यात येणार आहे. मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी तसा आदेश काढला असून पालिकेतील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना शुक्रवारी पालिकेत सायकलवरूनच प्रवेश करावा लागणार आहे. असी सक्तीच या आदेशाद्वारे मुख्याधिकाऱ्यांनी केली आहे.

कराड पालिकेत आता प्रत्येक शुक्रवारी सायकल डे उपक्रम

कराड पालिकेत आता प्रत्येक शुक्रवारी  "सायकल डे" उपक्रम 

मुख्याधिकाऱ्यांचे आदेश : सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना सायकलची सक्ती, अन्यथा लावणार विनावेतन गैरहजेरी 

कराड/प्रतिनिधी :
          येथील नगरपालिकेत आता आठवडयातील प्रत्येक शुक्रवारी "सायकल डे" उपक्रम राबविण्यात येणार आहे. मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी तसा आदेश काढला असून पालिकेतील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना शुक्रवारी पालिकेत सायकलवरूनच प्रवेश करावा लागणार आहे. असी सक्तीच या आदेशाद्वारे मुख्याधिकाऱ्यांनी केली आहे.
          पर्यावरणाचा समतोल, वाहतूक कोंडीपासून थोडीशी मुक्तता, आरोग्याची काळजी आदी बाबी लक्षात घेऊन मुख्याधिकाऱ्यांनी हा आदेश काढला आहे. त्यानुसार सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना आठवडयातील प्रत्येक शुक्रवारी नगरपालिकेत येताना सायकलवरूनच प्रवेश करावा लागणार आहे. तसे न केल्यास सदर अधिकारी व कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. जे "सायकल डे" पाळणार नाहीत. अशांची त्या दिवसाची विनावेतन गैरहजेरी लावण्यात येणार असल्याचेही मुख्याधिकारी डाके यांनी सदर आदेशात नमूद केले आहे. 
          तसेच पालिकेतील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी "सायकल डे" ची अंमलबजावणी करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.