पायाखालची वाळू सरकू लागल्याने राज्याच्या नेत्याची बेताल वक्तव्य: महेंद्र जानुगडे

 या निवडणुकीमध्ये स्वतःचा स्वार्थ साधता येत नाही; असे लक्षात आल्यानंतर काही पांढरी कपडे घालून मिरवणारे स्वार्थी ढोंगी लोक फुटले आणि विरोधी पार्टीला जाऊन मिळाले. एक-दोन कपड्याने पांढरे आणि मनाने काळे लोक फुटले म्हणजे संघटना फुटली असा त्याचा अर्थ होत नाही.

पायाखालची वाळू सरकू लागल्याने राज्याच्या नेत्याची बेताल वक्तव्य: महेंद्र जानुगडे

राज्याचे नेतृत्व करणाऱ्या नेत्याला स्वतःच्या तालुक्यातील कराड पाटण प्राथमिक शिक्षक सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत स्वतःचे पॅनल उभे करता आले नाही.फक्त २१ उमेदवार ज्यांना जमवता येत नाहीत त्यांनी मोठमोठ्या वल्गना करून इतरांना कमी दाखवण्यात धन्यथा मानू नये. इतरांच्या कुबड्या घेऊन पॅनल तयार करणाऱ्या आणि सभासद नसणाऱ्या लोकांना बँकेच्या कारभारात ढवळाढवळ करण्याचा अधिकार देणाऱ्या राज्य नेतृत्वाला आणि त्यांच्या पॅनलला निवडणुकीत हद्दपार करा असे प्रतिपादन गुरुमाऊली पॅनलचे प्रमुख महेंद्र जानुगडे यांनी केले. या पत्रकार परिषदेला महेंद्र जानुगडे,मच्छिंद्र ढमाळ, विकास देशमुख, बाजीराव शेटे, संजय शेजवळ यासह गुरुमाऊली पॅनलच्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती.

 कै. माजी आमदार शिवाजीराव पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसून ज्यांनी  वेगळी संघटना निर्माण केली. कै शिवाजीराव पाटील आण्णा  यांना अखेरच्या दिवसांमध्ये मानसिक आणि शारीरिक त्रास दिला.  अशा नेत्यांनी लोकांना नैतिकतेच्या गप्पा शिकवू नये. स्वतःला अडीच हजार सभासदांमधून २१ उमेदवार मिळत नाहीत. इतरांच्या कुबड्या घेऊन पॅनल तयार करणारे राज्याचे नेते म्हणवून घेतात यातच सर्व काही येत आहे.

विरोधक नेहमीच २३ चेअरमन केले अशा वल्गना करीत आहेत. हे २३ चेअरमन करणारे नेते आज राज्य नेत्याच्या पॅनल मध्ये आहेत. भरपूर माया जमवून ज्यांनी हे २३ अध्यक्ष निवडले आहेत ते टोप्या घलणारे सर्वांना परिचित आहेत.नितीन नलावडे सारख्या सर्वसामान्य शिक्षकाला वर्षभर खेळवून त्याची फसवणूक केली. हे लोक विसरलेले नाहीत. म्हणूनच प्रदीप कुंभार सारखे स्वच्छ चारित्र्याचे नेते आपल्या शेकडो कार्यकर्त्यासह आज गुरुमाऊली पॅनल ची सोबत करीत आहेत.

    अनेक लोक जे संस्थेचे सभासद नाहीत हेच लोक संस्था ताब्यात घेण्यासाठी लुडबुड करीत आहेत. याचा विचार लोकांनी करावा. स्वार्थासाठी दल बदलणाऱ्या लोकांना सभासदांनी या वेळच्या निवडणुकीत खड्यासारखे बाजूला ठेवावे. सर्वसामान्य शिक्षकांची अर्थवाहिनी असलेली आपली सोसायटी सर्वसामान्य सभासदांची राहावी म्हणून सर्वांनी प्रयत्न करावेत. डबल उमेदवारी करणारे स्वार्थी लोक आपला हेतू साधण्यासाठी आपल्या नेत्यासह विरोधी पक्षांमध्ये प्रवेश करून आपला स्वार्थ साधून घेत आहेत. हे उडदामधील काळे यावेळेस बाजूला ठेवून गुरुमाऊली पॅनलच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे. यावेळी गुरुमाऊली पॅनलचे सर्व प्रमुख मान्यवर उपस्थित होते.


 

मुलाला कामावर न पाठवता घेतला पगार

 स्वतःला राज्य नेतृत्व म्हणून घेणाऱ्या नेत्याने आपल्या मुलाला कराड पाटण सोसायटीत कामाला लावले. सर्वसामान्य शिक्षकांचा हक्क हिरावून घेतला.  वरती एकही दिवस मुलाला कामावर न पाठवता यथेच्छ पगार लाटला. हे प्रकरण आजही सर्वसामान्य शिक्षक सभासद विसरला नाही. याची जाण ठेवावी.