कराड येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसची निदर्शने

कराड येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसची निदर्शने

कराड/प्रतिनिधी : 

                        राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार हे कोणत्याही बँकेचे संचालक नसताना भाजप सरकारकडून सूडबुद्धीने, राजकीयद्वेषापोटी यांच्यावर ईडी चौकशी लावली आहे. याच्या निषेधार्थ जिल्ह्यासह राज्यभरात गेल्या दोन दिवसांपासून विविध ठिकाणी आंदोलनबंद पाळून या चौकशीचा निषेध नोंदवला जात आहे. त्यानुसार कराड येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारीकार्यकर्त्यांनी तीव्र घोषणाबाजी करत या चौकशीचा निषेध नोंदवला. 

                        येथील दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर शुक्रवारी सकाळी   11.30 वाजण्याच्या सुमारास हे निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष नंदकुमार बटानेसामाजिक कार्यकर्ते नाना खामकरमाजी नगरसेवक गंगाधर जाधवनगरसेवक वैभव हिंगमीरे,सागर जाधवपराग रामुगडेशिवाजी पवारअनिल धोत्रेपोपट साळुंकेमोहम्मद आवटे  यांच्यासह अन्यपदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.