रयत अथनी एकरकमी एफआरपी देणार

ऊस दराची कोडी फुटली ,रयत अथनी कारखान्याचे रयत संघटनेकडून अभिनंदन

रयत अथनी एकरकमी एफआरपी देणार

कराड / प्रतिनिधी

शेवाळेवाडी ता.कराड येथील रयत अथनी शुगर साखर कारखान्याने यावर्षीच्या ऊसाला पहिली उचल एकरकमी एफआरपी एवढी २९२५ रुपये जाहीर करून सातारा जिल्ह्यातील ऊस दराची कोंडी फोडली असल्याचे मत रयत क्रांति संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिन नलवड़े यांनी मांडले आहे जिल्ह्यातील इतर साखर कारखान्यानी रयत अथनीचा आदर्श घेवून लवकर आपली भूमिका जाहीर करावी अन्यथा रयत क्रांति संघटनेचे आंदोलन अटळ असल्याचे संघटनेच्या वतीने प्रसद्धि पत्रकाद्वारे कळविन्यात आले आहे.

कराड तालुक्यातील रयत अथणी शुगरने यावर्षीच्या ऊसाला पहिला हप्ता एक रकमी एफआरपीने २९२५ रुपये देण्याचे जाहीर केले आहे तसेच मागील वर्षीही रयत अथणी शुगर नी एफआरपी पेक्षा दीडशे रुपये जास्त ऊस दर दिलेला आहे सातारा जिल्ह्यातील ऊसदराची कोंडी फोडून एकरकमी एफ आर पी ने पहिला हप्ता देण्याचे रयत अथणी शुगर शुगर कारखाना प्रशासनाने जाहीर केल्याने रयत क्रांती संघटनेच्या वतीने कारखान्याचे चेअरमन उदयसिंह पाटील यांचा उसाची मोळी देऊन सत्कार करण्यात आला यावेळी संघटनेचे तालुकाध्यक्ष शिवाजी पाटील अशोक लोहार योगेश झांबरे अमर कदम पाटण अध्यक्ष कृष्ण क्षीरसागर सुरज नलवडे व शेतकरी उपस्थित होते

सातारा जिल्ह्यामधील साखर कारखान्यांचा गाळप  हंगाम सुरू करत आहेत परंतु रयत अथनी कारखाना सोडला तर इतर कारखण्यांनी एकरकमी एफआरपी वर अद्याप मौन पाळले आहे मागील वर्षी पाहिल हप्ता एकरकमी एफआरपी एवढा मिळाला नसल्यामुळे शेतकऱ्यांना ऊस दरात शंभर ते दीडशे रुपये प्रति टन कमी दर मिळाला असल्याचे शेतकरी संघटनेचे म्हणणे आहे शेतकरी ही मागील वर्षिच्या कमी ऊस दरामुळे नाराज आहे

जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी यावर्षीच्या ऊसाला पहिली उचल एकरकमी  एफ आर पी प्रमाणे व ऊस दर हा एफ आर पी अधिक पाचशे द्यावा अशी मागणी साठी सचिन नलवडे यांच्या वतीने गावोगावच्या बैठकीत केली जात आहे सातारा जिल्ह्यामध्ये यावर्षी एक रकमी एफ आर पी मिळावी यासाठी शेतकरी संघटना आक्रमक झालेले आहे कोल्ह्यपुर जिल्ह्यातील कारखाने एकरकमी एफआरपी जाहीर करत असताना सातारा जिल्ह्यातील कारखाने का शांत आहेत असा सवाल आता शेतकरी करू लागले आहेत शेतकऱ्यांचा एकरकमी एफआरपी च्या बैठकीना उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे रयत क्रांती संघटनेच्या वतीने लवकरच सातारा जिल्ह्याची दर ठरवणारी ऊस परिषद कराडमध्ये घेण्यात येणार आहे 


रयत अथणी साखर कारखान्यात उपपदार्थ तयार होत नसतानाही कारखाना जर एक रक्कमी एफ आर पी देत असेल तर उप पदार्थ बनवणाऱ्या कारखान्यांना ते शक्य का नाही जर इतर कारखान्यांनी एक रकमी एफ आर पी दिली नाही तर रयत क्रांती संघटना तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार आहे

सचिन नलावडे
रयत क्रांति संघटना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष