कराड रेल्वे स्थानकावर किरीट सोमय्या यांना अटक

भाजपचे आ. किरीट सोमय्या यांना कराड रेल्वे स्थानकावर सोमवारी 20 रोजी पहाटे 4.30 वाजण्याच्या दरम्यान कराड पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना पोलीस बंदोबस्तात येथील शासकीय विश्रामगृहाकडे नेण्यात आले आहे.

कराड रेल्वे स्थानकावर किरीट सोमय्या यांना अटक

कराड रेल्वे स्थानकावर किरीट सोमय्या यांना अटक 

 

कराड पोलिसांची कारवाई : पोलीस बंदोबस्तात शासकीय विश्रामगृहावर रवाना 

 

कराड/प्रतिनिधी : 

          भाजप आ. किरीट सोमय्या यांना कराड रेल्वे स्थानकावर अटक करण्यात आली. सोमवारी 20 रोजी पहाटे 4.30 वाजण्याच्या दरम्यान कोल्हापूरकडे जात असताना कराड पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना पोलीस बंदोबस्तात  येथील शासकीय विश्रामगृहाकडे नेण्यात आले आहे. 

          राष्ट्रवादीचे आमदार व ग्राम विकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर गेल्या दोन- तीन दिवसापूर्वी किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. तसेच त्यांच्या विरोधात पुरावे गोळा करण्यासाठी आणि तक्रार दाखल करण्यासाठी ते रेल्वेने कोल्हापूरला जाणार होते. या पार्श्वभूमीवर हसन मुश्रीफ यांच्या समर्थकांनी किरीट सोमय्या यांना कोल्हापुरात येण्यास मज्जाव केला होता. तसेच प्रक्षोभक वक्तव्येही केली आहेत. 

         या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हाधिकारी यांनी किरीट सोमय्या यांना नोटीस काढून कोल्हापूर जिल्ह्यात येण्यास मज्जाव केला होता. मात्र, तरीही किरीट सोमय्या हे मुंबईहुन रविवारी रात्री महालक्ष्मी एक्सप्रेसने कोल्हापूरकडे रवाना झाले होते. मात्र सोमवारी पहाटे 4.30 वाजण्याच्या सुमारास कराड पोलिसांनी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून किरीट सोमय्या यांना कराड रेल्वे स्थानकावर ताब्यात घेतले आहे. 

          यावेळी ओगलेवाडी (कराड) रेल्वे स्थानकावर 200 पेक्षा जास्त  पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, शहराध्यक्ष एकनाथ बागडी यांच्यासह भाजपचे कार्यकर्तेही उपस्थित होते. 

         त्यांनतर किरीट सोमय्या यांना कराड पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रणजित पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील यांनी पोलीस बंदोबस्तात त्यांना कराड शासकीय विश्रामगृहाकडे नेण्यात आले आहे.