पंचनामा , नोटीस , मात्र आदेश गुलदस्त्यातच......

रात्रीस खेळ चाले,सायंकाळ नंतर वाढता वावर

पंचनामा , नोटीस , मात्र आदेश गुलदस्त्यातच......

पंचनामा , नोटीस , मात्र आदेश गुलदस्त्यातच......

रात्रीस खेळ चाले,सायंकाळ नंतर वाढता वावर

पंचनामा करायचा नोटीस द्यायची आणि पुन्हा शांतता अशी गत कराड तहसील कार्यालयाची झाली आहे.गावकामगार तलाठी यांना कारवाईबाबत माहिती विचारली असता मंडल अधिकारी यांचे नाव सांगायचे आणि सर्कल यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नाव सांगायचे यामुळे कारवाईची माहिती देताना नेहमीच टाळाटाळ केली जात असून अवैध उत्खनन करणारावर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यासाठी उदासीनता कराड महसूल कार्यालय दाखवत आहे.यामुळे महसूल प्रशासन पोलीस अधिकारी असल्यासारखे सर्वच तपास स्वतःच्या नियंत्रणाखाली आणून ठेवत असल्याची चर्चा आहे.पंचनामा , नोटीस , मात्र आदेश गुलदस्त्यातच राहत असून रात्रीस खेळ चाले या उक्तीप्रमाणे प्रशासकीय इमारतीत सायंकाळ नंतर 'काहींचा' वाढता वावर चर्चेचा विषय बनला आहे.

दै प्रितिसंगमने अवैध मुरूम उत्खनन करणाऱ्या ठेकेदारांचा पर्दाफाश करीत काही दिवसांपूर्वी वास्तवतेचे दर्शन घडवणारी वृत्त मालिका प्रकाशित केली होती.याची दखल घेत कराड प्रांतअधिकारी यांनी याबाबत सखोल चौकशीचे आदेश दिले होते याबाबत संबंधित ठिकाणचे पंचनामेही झाल्याची चर्चा आहे.परंतु कारवाईबाबत अतिशय गोपनीयता बाळगली गेली आहे.यामुळे अवैध उत्खनन करणारे छाती फुगवून गावातून बढाया मारत फिरत असल्याची गावातीलच लोक कुजबुज करीत आहेत.परिणामी महसूल खात्याची प्रतिमा मालिन होऊ लागली आहे.'दाम करी काम' या म्हणीचा प्रत्यय तालुक्यातील जनतेला येऊ लागला असून वरकमाई करणे एकमेव उद्देश सफल करणे एवढा एकच हेतू असल्याची तालुक्यातील जनतेत चर्चा आहे.

कराड तहसील कार्यालयात अप्पर तहसीलदार यांची नेमणूक कराड उत्तर विधानसभा मतदार संघातील काही महसुली सर्कल मध्ये झाली होती परंतु परिविक्षाधीन अधिकारी असल्याने त्यांना निर्णय घेण्याची मोकळीक फारशी नसल्याची चर्चा तहसील कचेरीत सुरू होती.यामुळे महसुलचा सर्व स्टाफ व फिल्ड वरील कर्मचारी यांचे रिपोर्टिंग हे दोन वेगवेगळ्या अधिकाऱ्याकडे असल्याने कारभाऱ्याना नेम धरायला खांदा मिळाल्याची चर्चा जोरात सुरू होती.यामुळे अडचणीतले अडथले दूर होण्यास मदत झाल्याचीही खसखस पिकली असून परिविक्षाधीन अधिकारी यांना कधीही न मिळणारे मौलिक मार्गदर्शन या निमित्ताने आपल्या शासकीय नोकरीच्या सुरुवातीलाच झाले असल्याने अप्पर तहसीलदार सुद्धा तावूनसुलाखून परिपूर्ण झाले असल्याची चर्चा आहे.

 

कारवाईत सातत्य गरजेचे

कराड महसूल प्रशासन कारवाई करताना भेदभाव करीत असल्याची तक्रार नागरिकांची असून 'जी हुजूर'म्हणणारे महसूल कर्मचारी यांची चारी बोटे तुपात असल्याची चर्चा आहे.यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांना स्थानिक महसूल कर्मचारी चुकीची माहिती देऊन कारवाईचा बडगा उगारायला भाग पाडत असल्याची चर्चा असून महसूल विभागाने केलेले अवैध मुरूम उत्खनन प्रकरण गुंडाळले असल्याबाबत उलटसुलट चर्चांचे पेव फुटले आहे यामुळे महसूल प्रशासनाने कारवाईत सातत्य व समानता ठेवणे गरजेचे असल्याचे नागरिकांमधून व्यक्त होत आहे.