दै. प्रीतिसंगमच्या दणक्याने महसूलचा कारभार चव्हाट्यावर

प्लॉट नंबर सी १/२ मध्ये ११०० तर सी-१५ मध्ये १३२४ ब्रास अवैध गौण खनिज उपसा एकूण मिळून अंदाजित सुमारे २४२४ ब्रास अवैध गौण खनिज उत्खनन झाले असल्याचे महसूल विभागाने केलेल्या दोन्ही पंचनाम्यातून निदर्शनास येत आहे.यामुळे शासनाला लाखो रुपयांच्या महसूलाला मुकावे लागले आहे.यामुळे कराड महसूलचा कारभार चव्हाट्यावर असल्याची चर्चा आहे. 

दै. प्रीतिसंगमच्या दणक्याने महसूलचा कारभार चव्हाट्यावर

दै. प्रीतिसंगमच्या दणक्याने महसूलचा कारभार चव्हाट्यावर

कराड तालुक्यातील अवैध मुरूम उपसा फार्मात

 

प्लॉट नंबर सी १/२ मध्ये ११०० तर सी-१५ मध्ये १३२४ ब्रास अवैध गौण खनिज उपसा एकूण मिळून अंदाजित सुमारे २४२४ ब्रास अवैध गौण खनिज उत्खनन झाले असल्याचे महसूल विभागाने केलेल्या दोन्ही पंचनाम्यातून निदर्शनास येत आहे.यामुळे शासनाला लाखो रुपयांच्या महसूलाला मुकावे लागले आहे.यामुळे कराड महसूलचा कारभार चव्हाट्यावर असल्याची चर्चा आहे. 

 उब्रज / प्रतिनिधी

तासवडे ता.कराड येथील औद्योगिक वसाहतीतील प्लॉट नंबर सी १/२ मध्ये केलेल्या मधील केलेल्या अवैध गौण खनिज उत्खननात सुमारे ४२ लाख रुपये दंडाची नोटीस कराड तहसीलदार यांनी सदरच्या प्लॉटची मालकी असणाऱ्या कंपनीला दिली आहे.याबाबत तासवडे मुरूम उत्खनन प्रकरण गुंडाळणार का? असे वृत्त दै.प्रीतिसंगमने सोमवारच्या अंकात प्रकाशित केले होते व अजुन एक प्लॉट मुरूम टाकून भरून घेतल्याची बातमी प्रकाशित केली होती.या बातमीची दखल घेऊन गावकामगर तलाठी तासवडे यांनी सी १५ मधील प्लॉट व भर टाकून केलेल्या बांधकामाचा अंदाजे १३२४ ब्रास अवैध गौण खनिजाचा पंचनामा कराड महसूल कार्यालयात सादर केल्याची माहिती तासवडे व वराडे गावचे गावकामगार तलाठी संतोष जाधव यांनी दिली आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की तासवडे ता.कराड औद्योगिक वसाहतीतील प्लॉट न.सी १/२ मध्ये सातारा जिल्हाधिकारी यांची कोणतीही परवानगी न घेता अवैध गौण खनिज उत्खनन करण्यात आले होते.याबाबत कराड तहसीलदार यांचे आदेशावरून गावकामगार तलाठी तासवडे यांनी ११०० ब्रासचा पंचनामा केला होता.यावरून कराड तहसीलदार यांनी सदर प्लॉट मालकाला सुमारे ४२ लाखांच्या दंडाची नोटीस बजावली होती.परंतु याच प्लॉट मधील उत्खनन केलेला मुरूम अजून एका प्लॉट मध्ये वापरला असल्याची चर्चा औद्योगिक वसाहतीच्या परिसरात होती.याचे सविस्तर वृत्त दै.प्रीतिसंगमने केल्यानंतर तासवडे गावकामगार तलाठी यांनी सुमारे १३२४ ब्रास अवैध गौण खनिज उत्खनन केल्याचा पंचनामा केला आहे.

 

सोमवार दि.२४ ऑगस्ट रोजी गावकामगार तलाठी संतोष जाधव यांनी केलेल्या पंचनाम्यानुसार मौजे.तासवडे(एम आय डी सी)मधील प्लॉट न.सी /१५ मध्ये तलाठी तासवडे,पंच,कोतवाल हे सर्व मिळून पटेल स्टोन क्रशर प्रा.ली.मध्ये गेले असता अंदाजे १३२४ मुरूम भरलेचा आढळून येत आहे.सदरचा मुरूम हा चौकशी केली असता कोठून आणला समजून येत नाही तसेच सदर प्लॉट मध्ये इंजिनिरिंग वर्कसची इमारत असून त्या मध्ये फॅब्रिकेशन व्यवसाय सुरू असल्याचे दिसून येत आहे.व त्यांच्या पूर्व,पश्चिम,उत्तर अशा बाजूस सदरचा मुरूम टाकलेला आहे.असे दिसून येत आहे.यावरून सदरचा पंचनामा केला  आहे.

 

यामुळे तासवडे औद्योगिक वसाहतीत चाललेला गोरख धंदा महसूल प्रशासनाला कसा काय दिसत नाही ? असा सवाल परिसरातील ग्रामस्थ करू लागले आहेत.तसेच तळबीड महसूल सजाच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणात मुरूम उत्खनन झाले असून गावकामगार तलाठी तळबीड यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील अवैध गौण खनिज उपशाबाबत तातडीने कार्यवाही करावी अन्यथा जिल्हाधिकारी सातारा यांच्याकडे सदर प्रकरणात लक्ष घालून कठोर कारवाई करावी अशी मागणी होऊ लागली आहे.

 

मोजमाप अंदाजे का ?

महसूल विभागाने केलेले पंचनामे अंदाजे आहेत.याची प्रत्यक्ष मोजणी विभागातर्फे मोजणी होऊन दंड आकारणी झाली पाहिजे अशी चर्चा नागरिकांच्यात आहे.कारण अंदाजित पंचनाम्या पेक्षा जास्त गौण खनिज उत्खनन झाल्याची माहिती स्थानिक नागरिक देत आहेत.

परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घ्या

अवैध गौण खनिज उत्खनन होणाऱ्या परिसरातील सर्वच कंपन्यांच्या गेटवर सीसीटीव्ही कॅमेरे आहेत.यामध्ये वाहतूक केल्याचे स्पष्ट दिसत असल्याचे काही जणांनी नाव न सांगण्याच्या अटीवर माहिती गोपनीय स्वरूपात दिली आहे.यामुळे चाललेला सावळागोंधळ कराड महसूल विभाग उजेडात आणणार का ? याबाबत लोकांच्यात उलटसुलट चर्चा चालू आहे.