कराडच्या तहसिलदारांंसह, मंडलाधिकारी, गावकामगार तलाठी यांचे निलंबन करा

बळीराजा शेतकरी संघटनेची मागणी; अवैध उत्खननात लाखो रूपयांचा भ्रष्टाचार

कराडच्या तहसिलदारांंसह, मंडलाधिकारी, गावकामगार  तलाठी यांचे निलंबन करा
प्रांताधिकारी यांना निवेदन देताना बळीराजा शेतकरी संघटनेचे पदाधिकारी

कराडच्या तहसिलदारांंसह, मंडलाधिकारी, गावकामगार तलाठी यांचे निलंबन करा

बळीराजा शेतकरी संघटनेची मागणी; अवैध उत्खननात लाखो रूपयांचा भ्रष्टाचार

 

कराड / प्रतिनिधी

 

तासवडे ता.कराड येथील औद्योगिक वसाहतीत अवैध रित्या उपसा करण्यात आलेल्या मुरूम,दगड तसेच मातीच्या उत्खननाची कराडचे तहसीलदार अमरदिप वाकडे यांनी कोणतीही शहानिशा न करता स्वतःच्या लाखो रुपयांच्या फायद्यासाठी शासनाचा कोट्यावधी  रुपयाचा महसुल बुडवून भ्रष्टाचार केला आहे या अवैध उत्खननाची सखोल चौकशी करून तहसीलदारांसह मंडलाधिकारी व गावकामगार तलाठी यांना निलंबित करून गुन्हे दाखल करण्याची मागणी बळीराजा शेतकरी संघटनेने प्रांताधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

 

 

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तासवडे ता. कराड येथील औद्योगिक वसाहतीमधील प्लॉट क्रमांक सी-१ व सी-२ तसेच सी-१५ मधील अनाधिकृत गौण खनिजाचे मोठ्या प्रमाणावर उत्खनन झाले आहे.अवैध उत्खननावर तहसीलदार अमरदिप वाकडे यांनी दि.२४ ऑगस्ट रोजी  ४२ लाख ६० हजार ५०० रूपये व ५५ लाख ८७ हजार ९४२ रुपयांच्या दंडाच्या नोटीसा अवैध प्लॉट उत्खनन करणार्या संबंधितांना दिली होती. परंतु ज्या ठिकाणी केलेल्या अवैद्य उत्खननाबाबत कोणतीही शहानिशा तसेच तपास न करता अंतिम आदेश देताना कराडचे तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी औद्योगिक वसाहतीत प्लॉट धारकाला क्लिनचीट दिली असून कोणत्याही दंडाची आकारणी केली नसून सदरचे प्रकरण निकालात काढले आहे.

 

याबाबतीत काही दैनिकांमध्ये बातम्याही प्रसिद्ध झाल्या होत्या. झालेल्या  भ्रष्टाचाराची विभागीय आयुक्त पुणे यांच्यामार्फत सखोल चौकशी करून कराडचे तहसीलदार अमरदीप वाकडे, उंब्रज मंडलाधिकारी युवराज काटे तासवडे गाव कामगार तलाठी पद्मभूषण उर्फ संतोष जाधव यांनी संगनमताने केलेल्या मुरूम, दगड, माती या अवैध उत्खननाची सखोल चौकशी व्हावी तसेच कराड तहसीलदार अमरदीप वाकडे, उंब्रज मंडलाधिकारी युवराज काटे, तासवडे गावकामगार तलाठी पद्मभूषण उर्फ संतोष जाधव यांनी स्वतःच्या लाखो रुपयांच्या आर्थिक फायद्यासाठी शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवलेला आहे.यासाठी तहसीलदार मंडलाधिकारी तसेच गावकामगार तलाठी यांच्याकडील सदर ठिकाणचा पदभार काढून घेण्यात घ्यावा. अन्यथा सदरच्या व्यक्ती त्याच पदावर राहिल्यावर पदाचा गैरवापर करून या केसमध्ये व कागदपत्रांमध्ये फेरफार करण्याची शक्यता आहे.अवैध उत्खननात दिलेल्या  तक्रारीची तातडीने दखल घेऊन योग्य ती कारवाई व्हावी व शासनाचे झालेले कोट्यावधी रुपयांचे नुकसान तहसीलदार अमरदीप वाकडे यांच्याकडून वसूल करून त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराबाबत त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा तसेच प्लॉट क्रमांक सी-१ व सी-२ तसेच सी-१५ मधील केलेल्या दगड, मुरूम, माती यांची एटीएस मशीनद्वारे मोजणी व्हावी. अवैद्य उत्खननाची चौकशी न झाल्यास बळीराजा शेतकरी संघटना तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडणार असल्याचे इशारा दिला आहे. सदरचे निवेदन माहितीसाठी महसूलमंत्री बाळासाहेब पाटील, विभागीय आयुक्त सौरभ रावसो तसेच जिल्हाधिकारी शेखर सिंग  यांना देण्यात आले आहे.