अवैध मुरूम उत्खननाची प्रांताधिकार्‍यांनी घेतली दखल तहसिलदारासह, मंडलाधिकारी, गाव कामकार तलाठी यांच्या चौकशीचे काढले आदेश

गेली आठवडाभर महसूलचा गोलमाल ही मालिका आमच्या दैनिक प्रीतिसंगमने प्रकाशित केली आहे. तालुक्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी महसूल खात्याची परवानगी घेवून अथवा परवानगी न घेता मुरूम उपसा करण्यात आला आहे. याची दखल शासनाने घ्यावी आणि शासनाचा महसूल शासन दरबारी जमा व्हावा, याकरिता सर्वसामान्य नागरिकांना याची माहिती व्हावी आणि महसूल खात्यात चाललेल्या कारभाराची चौकशी व्हावी, अशी मागणी आमची होती. परंतू तहसिलदारांनी मंडल अधिकारी व गावकामगार तलाठी यांना नोटीसा बजवायला सांगायच्या. पंचनामे करायला लावायचे आणि अशा धनदांडग्या मुरूम ठेकेदारांना व माफियांना क्लिन चीट द्यायची, असे अनेक प्रकार गेल्या तीन वर्षात तालुक्यात घडले आहेत. वाळू तस्करी तर अमाप सुरू आहे. ज्याठिकाणी हेडक्वार्टर आहे त्याच ठिकाणी चक्क कृष्णा नदीच्या पात्रातून वाळू चोरी होत आहे. क्रशर अमाप सुरू आहेत. डोंगरांचे असलेले महत्वच नष्ट होत आहे. किती जणांना परवाना आहे व किती जणांना नाही. अनेक डोंगरे ‘बोडकी’ झाली आहेत. याचाही पोलखोल आम्ही यथाअवकाश करू.

अवैध मुरूम उत्खननाची प्रांताधिकार्‍यांनी घेतली दखल तहसिलदारासह, मंडलाधिकारी, गाव कामकार तलाठी यांच्या चौकशीचे काढले आदेश

अवैध मुरूम उत्खननाची प्रांताधिकार्‍यांनी घेतली दखल
तहसिलदारासह, मंडलाधिकारी, गाव कामकार तलाठी यांच्या चौकशीचे काढले आदेश

कराड/प्रतिनिधीः-

तासवडे औद्योगिक वसाहतीतील मुरूम उत्खनन प्रकरणाची अखेर प्रांताधिकार्‍यांनी दखल घेतली असून त्यांनी तहसिलदार, मंडल अधिकारी व गाव कामगार तलाठी यांना या प्रकरणाचा लेखी खुलासा करण्याची मागणी केली आहे व त्यांच्याजवळ असलेली कागदपत्रे घेवून समक्ष उपस्थित राहण्याचे आदेश जारी केले आहेत. या प्रकरणावर गेली आठवडाभर तालुक्यातील महसूलचा गोलमाल ही मालिका आम्ही प्रकाशित केली आहे. प्रांताधिकार्‍यांनी एका प्रकरणाची चौकशी करण्यापेक्षा तालुक्यातील 38 प्रकरणांची चौकशी करावी, अशी आमची मागणी आहे. त्याचबरोबर बळीराजा शेतकरी संघटनेने दिलेल्या इशार्‍यानंतर शासन खडबडून जागे झाले आहे. मुरूम उपसा कसा झाला यापेक्षा शासनाचा महसूल किती बुडला याची चौकशी व्हावी आणि शासनाने तो महसूल भरून घ्यावा, एवढीच माफक अपेक्षा आहे.

तासवडे ता.कराड येथील औद्योगिक वसाहतीत अवैध रित्या उपसा करण्यात आलेल्या मुरूम, दगड तसेच मातीच्या उत्खननात तहसीलदार अमरदिप वाकडे यांच्यासह मंडलाधिकारी व गाव कामगार तलाठी यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची व शासनाचा कोट्यावधी रूपयांचा महसूल बुडवल्याचा आरोप बळीराजा संघटनेने लेखी दिलेल्या निवेदनाची प्रांताधिकार्‍यांनी दखल घेत चौकशीचे आदेश काढले आहेत.

बळीराजा संघटनेने दिलेल्या निवेदनानुसार तासवडे ता. कराड येथील औद्योगिक वसाहतीमधील प्लॉट क्रमांक सी-1 व सी-2 तसेच सी-15 मधील अवैध गौण खनिजाचे मोठ्या प्रमाणावर उत्खनन झाले आहे.अवैध उत्खननावर तहसीलदार अमरदिप वाकडे यांनी दि.24 ऑगस्ट रोजी  42 लाख 60 हजार 500 रूपये व 55 लाख 87 हजार 942 रुपयांच्या दंडाच्या नोटीसा अवैध मुरूम उपसा करणार्‍या संबंधितांना दिली होती. मात्र अवैद्य उत्खननाबाबत कोणतीही शहानिशा तसेच तपास न करता अंतिम आदेश देत तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी औद्योगिक वसाहतीत प्लॉट धारकाला क्लिनचीट दिली असून कोणत्याही दंडाची आकारणी केली नसून सदरचे प्रकरण निकालात काढले आहे. याबाबत अवैध मुरूम उत्खननाची व झालेल्या भ्रष्टाचाराची  सखोल चौकशी व्हावी यासाठी बळीराजा संघटनेने मुख्यमंत्री यांच्या सह  विभागीय आयुक्त पुणे, प्रांताधिकारी यांना लेखी निवेदनाद्वारे मागणी केली होती.

याची दखल घेत  प्रांताधिकार्यांनी तहसीलदार अमरदीप वाकडे, उंब्रज मंडलाधिकारी युवराज काटे तासवडे व गाव कामगार तलाठी पद्मभूषण उर्फ संतोष जाधव यांच्या चौकशीच्या अनुषंगाने प्रांताधिकार्यांनी बळीराजा संघटनेने आपली बाजू मांडण्यासाठी  नोटीसाद्वारे बोलावणे केले आहे.