एसीबीच्या कारवाईचा खरा सूत्रधार कोण ?

कोल्हापूर ते कराड कनेक्शन भानगड काय जातीचे दाखले संशयाच्या भोवऱ्यात

एसीबीच्या कारवाईचा खरा सूत्रधार कोण ?

कराड/ प्रतिनिधी

कराड येथील महसूल कार्यालय कायमच वेगवेगळ्या कारणाने चर्चेत असते, अशातच काल सांगलीच्या लाचलुचपत पथकाने तहसील कार्यालयात धाड टाकली ही धाड वर करनी आहे, एसीबीच्या पथकाने धरला तो खाजगी इसम, खरे तर याचा मुख्य सूत्रधार कोण ! जातीचा दाखला कोणत्या कार्यालयातून दिला जातो याची चौकशी व्हावी तसेच  आत्तापर्यंत या कार्यालयाकडून किती दाखले देण्यात आले आणि  त्याच्यासाठी किती रक्कम घेतली याची चौकशीही होणे गरजेचे आहे प्रत्यक्षात धरला तो खाजगी आणि सुटला तो मलईदार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

कराड शहरातील महसूल  खात्याविरोधात आम्ही वारंवार लिखाण केले यापूर्वी अवैध मुरूम उपसण्याची मालिकाच प्रसिद्ध केली यामुळे अवैध मुरूम उपसा करणाऱ्याचे धाबे दणाणले आणि कोट्यावधीचा महसुल शासनाच्या खात्यामध्ये जमा झाला, त्यावेळी आमच्याकडे संशयाने पाहिले पण यातून शासनाचा फायदा झाला, आमचे आजही तेच मत आहे जर कोणाला धंदा करावयाचा आहे मग तो मुरूम उपसा असो अथवा इतर कोणताही असो तो नियमाने झाला पाहिजे त्यासाठी शासनाचा कर भरला पाहिजे अशी मागणी करणे गैर नाही, पण शासनाच्या खात्यात पैसे जमा होऊन आपला काय फायदा असे म्हणणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात लिखाण केली की लिहिणारा वाईट असे मत निर्माण होते, परंतु अलीकडे नवीन पायंडा महसूल खात्यात पडला आहे, अवैध उत्खननाविरोधात लिखाण केले की आणि बातमी प्रसिद्ध झाली की अधिकारी वाढवून मलीदा गोळा करण्यात मग्न होतात, त्या धंदेवाल्यांना चुकीची माहिती द्यायची आणि आपली रक्कम वाढवायची ही नवीन पद्धत उदयास आली आहे, शासनाचा महसूल बुडवायचा आणि आपला खिसा भरायचा यासाठी सर्कल, तलाठी यांचा वापर करायचा पंचनामे करायला लावायचे, संबंधित व्यक्तीला बोलवून घ्यायचे, आणि तडजोड करून प्रकरण मिटवून टाकायचे, एकीकडे आम्ही कारवाई केली असे भासवायचे आणि दुसरीकडे रक्कम वाढवायची, आपला खिसा भरायचा आणि तलाठी सर्कल यांना बदनाम करायचे, हे किती दिवस चालणार, 

असाच काल एक प्रकार घडला सांगली येथील एसीबीच्या पथकाने तहसील कार्यालयातील खाजगी कर्मचाऱ्याला पन्नास हजाराची लाच मागितल्याबद्दल अटक केली ही कारवाई झाली खरी, पण तो दाखला कोणी तयार केला,तो कुठल्या कार्यालयातून दिला जातो याचा शोध ही घेणे गरजेचे आहे, ही कारवाई तशी जुनीच  आहे ,गेल्या दीड महिन्यापासून या विषयावर चर्चा दबक्या आवाजात सुरू होती,आणि या चर्चेला अलीकडे चांगलेच उदान आले होते, प्रत्यक्षात ही कारवाई काल झाली त्यामध्ये एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला, त्यांनी  आपले नाव घेऊ नये म्हणून काही अधिकारी गयावया करत होते, अशी चर्चा सध्या या परिसरात सुरू आहे,,! कुणबी जातीचा दाखला देण्यासाठी कोणी कोणी प्रयत्न केले तक्रारदार कुणाच्या संबंधातील आहे तो कोल्हापूर कडून कराडकडे आला कसा? त्याचे नातेवाईक असले तरी दाखला मागणी कधी केला? दाखला दिला त्याची तारीख किती?दाखला मागणी केला त्याची तारीख किती? आणि हा दाखला देण्यासाठी कोणी कोणी प्रयत्न केला? दाखल्यासाठी कोणत्या अधिकाऱ्यांनी संबंधित व्यक्तीला पैसे गोळा करण्याचा अधिकार दिला  होता?या सर्व बाबीचा तपास व्हावा आणि सत्य बाहेर यावे,' ना खाऊंगा ना खाने दूंगा' असे म्हणणारे सरकार सत्तेत आहे मुख्यमंत्री या जिल्ह्यातील आहेत, मग ही कारवाई वरवर का?याची सखोल चौकशी झालीच पाहिजे, तपास झालाच पाहिजे !, अशी अनेकांची मागणी आहे, कराडातील सेतू कार्यालय मुळात वादाच्या भोवऱ्यात वावरात आहे, या ठिकाणी अनेक प्रकारे लुटारू टोळी काम करत असते, त्याहीपेक्षा नाव सेतू कार्यालयाचे, आणि काम दुसऱ्याच व्यक्तीचे, अशी परिस्थिती या कार्यालयात सध्या सुरू आहे, याचा यथावकाश  सर्व  प्रकार बाहेर येईलच, जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई होईल, सर्वसामान्य लोकांना लुटणारी ही सेतू कार्यालयातील टोळी उघड झालीच पाहिजे आणि या लुटारूंचा म्होरक्या या प्रकरणात उघड झालाच पाहिजे, आणि तसे झाले तरच  खरी कारवाई झाली असे म्हणावे लागेल अन्यथा अशा अनेक खाजगी व्यक्ती आहेत, नोकरी लावतो म्हणून पैसा गोळा करतात, तहसील कार्यालयाच्या पायरीवर अनेक जण पडून आहेत, तुम्हाला हवे असेल ते काम करतो आणि आम्हाला पाहिजे ते द्या अशी म्हणणारी टोळी आज पर्यंत कोणी सांभाळली आहे याचाही शोध घ्या आणि सर्वच यंत्रणेचा कारभार चव्हाट्यावर आणा अशी  मागणी  जोर धरू लागली आहे,!


दाखल्या साठी मोठी फिल्डिंग,सगळेच मालामाल

कुणबी,ठाकर,नामदेव कोळी जातींचे दाखले बिनभोबाट कराड प्रांताधिकारी कार्यालयातून दिले जात असल्याची उलटसुलट चर्चा असून पाचशे ब्रासच्या वरील गौण खनिज उत्खनन परवानगी आणि जातीचे दाखले कमाईचे साधन म्हणून प्रांत कार्यालय वापरत असून कॉम्प्युटर ऑपरेटर 'योग्य यश' हाताला मिळाल्या शिवाय दाखले सोडत नसल्याची सेतू चालकांच्यात कुजबुज असून प्रांत कार्यालयातील माहिती तंत्रज्ञान विभागाच्या माणसाचा तोरा क्लास वन अधिकाऱ्यालाही लाजवेल असा असून सुटा बुटात वावरणारा डामडोल वरकमाईचा आकडा किती मोठा असेल याचीच खात्री देत आहे.दाखल्या साठी मोठी फिल्डिंग लावली जात असल्याने सगळेच मालामाल होत असल्याची कुजबुज आहे