महसूल खात्याची अवस्था म्हणजे ‘कुंपना’नेच शेत खाल्ल्यासारखी....!

सेटलमेंट आण्णासाहेबांची सर्व पातळीवर चौकशी करा

महसूल खात्याची अवस्था म्हणजे ‘कुंपना’नेच शेत खाल्ल्यासारखी....!

महसूल खात्याची अवस्था म्हणजे ‘कुंपना’नेच शेत खाल्ल्यासारखी


सेटलमेंट आण्णासाहेबांची सर्व पातळीवर चौकशी करा


कराड तालुक्यातील महसूल खात्याची अवस्था कुपनानेच शेत खाल्ल्यासारखी आहे.याठिकाणी तळ ठोकून अनेक वर्षे काम करणारे आण्णासाहेब सर्व काही अलबेल असल्याच्या अर्विभाजात वावरत आहेत. अशा या सेटलमेंट आण्णासाहेबांची सर्वच पातळीवर चौकशी करून जिल्हाधिकार्‍यांनी त्यांच्यावर कारवाई करावी व अन्य तालुक्यातील रस्ता दाखवावा तरच येथील महसूल खाते बदनामीपासून वाचेल. अन्यथा कोणीही तालुक्याचा कारभारी घेवून आला तरी या कार्यालयाची अवस्था येरे माझ्या मागल्यासारखी राहील.

 

कराड तालुक्यातील गौण खनिज उत्खननाचा पोलखोल करण्याचे काम सुरू आहे. अनेक ठिकाणी चुका झाल्या आहेत त्या सुधारण्याचे कामही महसूल खात्याने सुरू केले आहे. रावसाहेबांनी अनेक प्रकरणांची कागदपत्रे तपासणीसाठी मागवली आहेत. परंतू ज्या ज्या गावामध्ये हे सेटलमेंट आण्णासाहेब ड्युटी करतात, त्यांची गावे कोणती आहेत. हे पाच पांडव जोपर्यंत कराडात आहेत तोपर्यंत हे असेच चालणार. चौकशी करायचे म्हंटले तर कोणाची करायची? हा प्रश्नच रावसाहेबांच्यासमोर उभा राहू शकतो. या पाच पांडवांच्या पाच सर्कलमध्ये जे काय सुरू आहे. त्यामुळेच हे खाते बदनाम होत आहे. दिवसभर कार्यालयाच्या भोवती फिरायचे आणि आपणाला जे हवे तेच वरून करून आणायचे अशी परिस्थिती या सेटलमेंट आण्णासाहेबांची आहे. त्यांच्या नियुक्त्या ज्या ठिकाणी आहेत,त्याचठिकाणी मुरूम, वाळू व खानीचा व्यवसाय जोमात आहे. यांना अन्यत्र बदलले गेले तर ते पाण्यातून बाहेर काढलेल्या माशासारखे तडफडत असतात. केंव्हा एकदा या गोण खनिज पट्ट्यात आपली नियुक्ती होते. यासाठी खालून वरपर्यंत सेटींग लावण्याचे कामही यापुर्वी झाल्याचे पहायला मिळाले आहे.

कराड तालुक्यात 12 सर्कल असून त्याठिकाणी काम करणारे सर्वच आण्णासाहेब अवैद्य काम करतात असे आमचे म्हणणे नाही. पण केवळ हाताच्या बोटावर मोजण्या इतपत काम करणार्‍या आण्णासाहेबांच्यामुळे हे खातेच बदनाम होत चालले आहे. प्रामाणिक काम करणार्‍यांची दफ्तर तपासणी होते. सातबारा संगणकीकृताचे झाले की नाही याची तपासणी होते. वेगवेगळ्या शासकीय आदेशाने आलेली कामे करण्यात हे सर्वजण मग्न असतात. मात्र, हे पाच पांडव ऑफिसच्या भोवती फिरून आपले कामकाज करत असतात. त्यांना नेमून दिलेल्या ठिकाणी ते आठवड्यातून एकदातरी जातात का? तेथील नागरिकांचे प्रश्न सुटतात का? ज्या गावामध्ये त्यांच्या नियुक्त्या आहेत त्या गावचे ग्रामस्थ आपल्या नोंदीसाठी सातबारासाठी यांच्या सह्या घेण्यासाठी दिवस-दिवसभर ताटकळत बसलेले पहायला मिळतात. अनेकांना गावातून सकाळी तालुक्याचे ठिकाणी गाठावे लागते. मग तलाठी भेटणार त्यानंतर त्यांचा सातबारा निघणार याकरिता या नागरिकांचा पुर्ण दिवस गेलेला असतो. सर्कल स्तरावर काम असेल तर मात्र सकाळी आलेला नागरिक सर्कलच्या सहीसाठी संध्याकाळपर्यंत ताटकळूनही अनेकांची कामे होत नाहीत. नैराश होवून नागरिक परत जातात. याचे सोयरसुतक कोणालाही नाही.

सातबारा संगणकीकृत झाला असला तरी नोंदीसाठी अर्थपुर्ण व्यवहार केल्याशिवाय कोणत्याच माणसाची नोंद धरली जात नाही. अशी स्थिती या विभागाची झाली आहे आणि हे होण्यामागे केवळ हे सेटलमेंट आण्णासाहेबच जबाबदार आहेत. अशा या आण्णासाहेबांना शोधून काढून जिल्हाधिकार्‍यांनी अन्य तालुक्याचा रस्ता दाखवावा व बदनाम होत असलेले महसूल खाते सुसज्ज कसे होईल हे पहावे. इमारत सुसज्ज असून चालत नाही तर आतील कामकाजही सुसज्ज असणे गरजेचे आहे. या खात्याची अवस्था सध्या कुपनच शेत खातंय अशी झाली आहे.