पी.एम.किसान योजनेतील १ हजार २०० लाभार्थीनी अपडेटेड आधार जमा करावे :- तहसीलदार विजय पवार

पी.एम.किसान योजनेतील १ हजार २०० लाभार्थीनी अपडेटेड आधार जमा करावे :- तहसीलदार विजय पवार

पी.एम.किसान योजनेतील १ हजार २०० लाभार्थीनी अपडेटेड आधार जमा करावे :- तहसीलदार विजय पवार

उंब्रज/प्रतिनिधी

कराड तालुक्यातील पी.एम.किसान योजनेतील प्रलंबित २ हजार २५१ लोकांचे यादीमधील जवळपास १ हजार २०० लोकांचे काम प्रलंबित आहे.कराड महसूल कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी १ हजार लोकांना लाभ चालू करून दिला आहे.गावकामगार तलाठी तसेच ऑनलाइन विभागाच्या कार्यतत्परतेमुळे सर्व लाभार्थी शेतकर्‍यांना याचा लाभ मिळाला असल्याचे तहसीलदार विजय पवार यांनी दै प्रीतिसंगमशी बोलताना सांगितले.

कराड तहसील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील पी.एम.किसान योजनेच्या प्रलंबित यादीमधील काही लाभार्थीनी आधार कार्ड वगळता इतर कागदपत्रे सादर केली होती. ड्रायव्हिंग लायसन्स, मतदान कार्ड,पॅन कार्ड त्यांची ही यादी आहे या सर्व लोकांना त्यांचे मार्च २०२१ नंतर अपडेट केलेले आधार कार्ड संबंधित विभागाकडे जमा करावे किंवा गावपातळीवर प्रलंबित यादीतील लाभार्थ्यांचे आधार कार्ड गोळा करून सेतू मधील श्रीमती कोकरे मॅडम यांच्याकडे जमा करावे.अशी माहिती यावेळी त्यांनी दिली आहे.

प्रलंबित लाभार्थ्यांच्या याद्या संबंधित गावचे गावकामगार तलाठी यांचेकडे उपलब्ध असून पीएम किसान या योजनेसंदर्भातील आहेत.ज्यामध्ये वर्षाला केंद्र सरकारकडून सहा हजार रुपये प्रति शेतकरी सध्या मिळत आहेत.सदरचे यादीतील नावे वगळता पी एम किसान योजनेतील इतर लोकांनी आपली कागदपत्रे जमा करू नयेत. त्यामध्ये सध्या सुधारणा करता येत नाही असेही यावेळी तहसीलदार पवार यांनी सांगितले.

 

मयत खातेदाराच्या वारसांनी मयत दाखले जमा करावेत

पी एम किसान योजनेच्या प्रलंबित यादीतील काही खातेदार मयत असतील तर त्यांच्या वारसांनी याबाबत पुरावा म्हणून मयत दाखला सादर करावा यामुळे संबंधित वारसांना या योजनेचा लाभ मिळेल.

विजय पवार
कराड,तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी