लॉकडाऊन मधील 'दारू'ची नवीनच आयडिया वाचा...

अवैध दारू विक्रेत्यांनी केला मोठा स्टॉक लोकांच्यात चर्चा काही 'नामांकित' ही अवैध दारू विक्रीच्या साठेलोट्यात

लॉकडाऊन मधील 'दारू'ची नवीनच आयडिया वाचा...

कराड/प्रतिनिधी

कोरोनाची वाढती संसर्ग साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सातारा जिल्ह्यात शुक्रवार ता.१७ ते रविवार ता.२६ पर्यंत कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी विविध वस्तूंच्या खरेदीसाठी आज परिसरातील बाजारपेठेत मोठी गर्दी केली होती.तर याच काळात 'तळीरामां'च्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी परिसरातील बिअर बार व वाईन शॉपमधून छुप्या पध्दतीने आज मोठ्या प्रमाणात देशी-विदेशीची विक्री झाली. दरम्यान परिसरातील महामार्गाचे नजीकच्या एका पोलीस ठाण्याच्या पोलीस दादांनी विक्री करण्यासाठी नेणाऱ्या या अवैध दारु विक्रेत्यांकडून आज चांगलीच वरकमाई कमावली असल्याची चर्चा आहे.

लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर कोरोनाची वाढती संसर्ग साखळी तोडण्यासाठी व कोरोना परिस्थिती नियंत्रणासाठी जिल्हाधिकारी शेखरसिंह यांनी धाडसी निर्णय घेऊन चांगले नांव कमवले आहे.मात्र,उद्यापासून सुरू होणाऱ्या लॉकडाऊनच्या नव्या टप्याच्या पार्श्वभूमीवर दारू अवैध रित्या वाहतूक करणाऱ्या अवैध  व्यवसायिकाकडून वरकमाई करून 'दादां'नी आपले नांव गमावले,तशी चर्चा ही परिसरात सुरू आहे.

अवैध दारू विक्रेत्यांनी दारू विक्रीसाठी लढवलेल्या फंड्यावर कारवाईच्या नावाखाली पोलिसांनी केलेल्या या वरकमाईची आज दुपारनंतर परिसरात मोठी चर्चा सुरू होती.कोरोनाची हाताबाहेर गेलेली परिस्थिती नियंत्रित करण्यासाठी जिल्हाधिकारी विविध उपाय योजना करताना असताना खाकीकडून मात्र, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला चुना लावला जात असल्याची प्रचिती परिसरातील नागरिकांना आली. नेहमीच कारवाईची टिमकी वाजवणाऱ्या खाकीकडून साखळी पद्धतीने झालेल्या तोडपाणी प्रकरणाची परिसरात मोठी चर्चा सुरू आहे.कुंपणच शेत खात असल्याने हा लॉकडाऊन यशस्वी होईल काय? याबाबत वरीष्ठ प्रशासनाने योग्य उपाययोजना करण्याची गरज आहे.