उंब्रजमध्ये परप्रांतीय नागरिकांची मेडिकल तपासणी मध्ये 'त्या' खाजगी डॉक्टरचा घोळ

उंब्रजमध्ये परप्रांतीय नागरिकांची मेडिकल तपासणी मध्ये 'त्या' खाजगी डॉक्टरचा घोळ

उंब्रज/प्रतिनिधी

परप्रांतीय लोकांना आपल्या मूळ गावी जायचे असेल तर आरोग्य तपासणी अनिवार्य केली असल्याने असा तपासणी दाखला देताना 'एका' खाजगी डॉक्टरने माया जमवली असल्याच्या चर्चेने खळबळ उडाली आहे.मानवतेच्या भावनेतून असे आरोग्य दाखले पैसे न घेता विनामोबदला देण्यासाठी शासनाने आवाहन केले होते.लोकांच्या असहायतेचा फायदा घेऊन कोरोना महामारीच्या काळात पिळवणूक करणाऱ्या 'त्या'डॉक्टरची चौकशी होऊन योग्य ती कारवाई केली जावी अशी मागणी होऊ लागली आहे.

कोरोना महामारीच्या काळात डॉक्टरांना देवाच्या रुपात जनता पहात असताना काही सैतानरुपी दानव सुद्धा कार्यरत झाल्याचे या घटनेने उघड झाले असून आरोग्य तपासणी साठी हातही न लावता २०० ते ३०० रुपये लगोलग मिळत असल्याने गोरगरिब मजुरांच्या मुंड्या पिरगळुन काही महाभाग लूटमार करीत असल्याने गरिबांना कोणी वाली आहे का असा प्रश्न पडत आहे 

उंब्रज वैद्यकीय अधिकारी हे वनवासमाची येथे कार्यरत असल्याने सहायक वैद्यकीय अधिकारी यांनी याबाबत भूमिका घेणे महत्वाचे होते परंतु त्यांनीच 'त्या' डॉक्टरचा रस्ता परप्रांतीय लोकांना दाखवला असल्याची माहिती दिली