चिखलीकर आप्पा प्रचाराच्या आखाड्यात

कराड उत्तर विधानसभा शेत्रात पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील प्रचार शिगेला पोहचला असून नेते व कार्यकर्ते कामाला लागले आहेत .

चिखलीकर आप्पा प्रचाराच्या आखाड्यात
चिखलीकर आप्पा प्रचाराच्या आखाड्यात

चिखलीकर आप्पा प्रचाराच्या आखाड्यात

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील प्रचार शिगेला पोहचला

उंब्रज/प्रतिनिधी

राष्ट्रीय काँग्रेसचे जुने जाणते नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची सावली म्हणून जिल्ह्यात परिचित असणारे अजितराव पाटील आप्पा चिखलीकर असे लांबलचक नावाची ओळख असणारे काँग्रेसचे एकनिष्ठ नेते पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघात प्रचाराच्या निमित्ताने सक्रिय झाल्याने निवडणुकीला रंग भरायला सुरुवात झाली आहे.आपल्या रांगड्या बोली भाषेत विरोधकांना चिडीचूप करणारी धडदडती तोफ मैदानात आल्यानंतर आप्पा विरोधकांचा समाचार कसा घेणार याकडे सर्वांचेच डोळे लागले आहे.

आप्पानी कराड उत्तर मधील सर्वच शाळांना भेटी देण्याचा सपाटा लावला असल्याने शाळा टू शाळा प्रचार मोहीम सुरू असून यामुळे पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.पाटील हायस्कूल चिखली आणि इंदिरा कन्या शाळा आणि इंदिरा डीएड कॉलेज मसूर येथील शिक्षक मतदार आणि पदवीधर मतदार यांना समक्ष भेटून चर्चा केली तसेच आणि महा विकासआघाडीच्या अधिकृत उमेदवारांना म्हणजेच प्रा. जयंत आसगावकर आणि अरुण लाड अण्णा यांना आपलं अमूल्य मत देऊन भरघोस मतांनी विजयी करावे असे आवाहन आप्पा आपल्या विशिष्ट शैलीत करीत आहेत.

विधासभेच्या आखाड्यात आपल्या वक्तृत्वाने श्रोत्यांना जागीच खिळवून ठेवणारे आप्पा सध्या तरी वयक्तिक भेटी गाठीवर भर देत आहेत परंतु आप्पांचे वातावरण तयार करणारे भाषण अजून ऐकायला मिळाले नसल्याची खंत कराड उत्तर मधून व्यक्त होत असून आप्पांची हलगी कडाडल्या शिवाय निवडणुकीला रंगत येणार नसल्याची चर्चा मतदारांच्यात आहे.यामुळे होउदे व्हायरल म्हणत आप्पा प्रचाराच्या निमित्ताने विरोधकांवर कसा निशाणा साधणार याकडे पदवीधर तसेच गुरुजींचे लक्ष लागून राहिले आहे.