वडगांव (उंब्रज) मध्येही कुणबी मराठा नोंदी

वसे,झाडे,वाघमारा,भोसले यांच्या १९०९ ते १९२८ दरम्यान जन्म नोंदी कुणबी

वडगांव (उंब्रज) मध्येही कुणबी मराठा नोंदी

वडगांव (उंब्रज) ता.कराड येथील जुन्या जमान्यातील काही वयस्कर नागरिकांकडून कुणबी मराठा नोंदी बाबत माहिती घेतली असता खूप जुन्या काळात तुळजापूर येथून काही शेतकरी कुटुंबे पेशवेकालीन काळात वडगांव (उंब्रज) येथे स्थलांतरित झाल्याची माहिती मिळाली,याबाबतची खातरजमा करण्यासाठी कराड तहसीलदार कचेरीतील १९०० ते १९२८ दरम्यान जन्माच्या नोंदीबाबत माहिती घेतली असता वसे,झाडे,वाघमारा व भोसले नावांच्या पुढे कुणबी अशी नोंद असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे.

यामुळे कधी काळी वसे,झाडे,वाघमारा,भोसले अशी नावे असणारी कुटुंबे काळाच्या ओघात वसे व झाडे कुटुंब कदम नावाने तर वाघमारा व भोसले कुटुंबे  साळुंखे तसेच मूळ नावाने गावात परिचित असल्याची खातरजमा करून घेतली यावेळी महसुली पुरावा म्हणून ७/१२ अभ्यासला असता याबाबतची पुष्टी होत आहे यामुळे शासन आदेशाने भविष्यात कुणबी दाखले मिळताना वडगांव (उंब्रज) गावचा प्राधान्याने विचार होणार असल्याची माहिती मिळत आहे याबाबत मंडलाधिकारी व गावकामागर तलाठी यांनी कराड प्रांताधिकारी यांच्या निदर्शनास सदरची कागदोपत्री पुरावे आणून देणे गरजेचे असल्याचे मत वडगाव (उंब्रज) येथील नागरिक व्यक्त करीत आहेत.