कराड विमानतळ परिसरातील बांधकाम परवानग्यांचा प्रश्न मार्गी

कराड विमानतळाच्या २० किमी परिघामधील बांधकामांवर विमानतळ विकास प्राधिकरणाने घातलेल्या काढून त्याचा कलर कोडेड झोनिंग मॅप प्रसिद्ध करावा, यासाठी माजी मुख्यमंत्री आ. प्रथ्वीराज चव्हाण यांनी केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया व भारतीय विमानपतन प्राधिकरणचे अध्यक्ष संजीव कुमार यांची भेट घेतली. या चर्चेदरम्यान केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांनी तात्काळ महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना फोनवरून कलर कोडेड नकाशा प्रसिद्ध करण्याच्या व त्यानुसार बांधकामाबाबतच्या अटी शिथिल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार तात्काळ आदेशाची अंमलबजावणी करत संबंधित विमान प्राधिकरणाने कलर कोडेड झोनिंग मॅप देत त्याचा अध्यादेशही काढला आहे. त्यानुसारची नवीन नियमावलीही प्राधिकरणाकडे उपलब्ध झाल्याने कराड विमानतळ परिसरातील बांधकाम परवानग्यांचा प्रश्न मार्गी लागला आहे.

कराड विमानतळ परिसरातील बांधकाम परवानग्यांचा प्रश्न मार्गी

कराड विमानतळ परिसरातील बांधकाम परवानग्यांचा प्रश्न मार्गी

आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट : कराडच्या नगरसेवकांसह बांधकाम व्यवसायिकांचाही समावेश

कराड/प्रतिनिधी :

     कराड विमानतळाच्या २० किमी परिघामधील बांधकामांवर विमानतळ विकास प्राधिकरणाने घातलेल्या काढून त्याचा कलर कोडेड झोनिंग मॅप प्रसिद्ध करावा, यासाठी शुक्रवारी २५ रोजी राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. प्रथ्वीराज चव्हाण यांनी कराडच्या नगरसेवक व बांधकाम व्यावसायिकांसह केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया व भारतीय विमानपतन प्राधिकरणचे अध्यक्ष संजीव कुमार यांची भेट घेतली. या चर्चेदरम्यान केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांनी तात्काळ महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना फोनवरून कलर कोडेड नकाशा प्रसिद्ध करण्याच्या व त्यानुसार बांधकामाबाबतच्या अटी शिथिल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे कराड विमानतळ परिसरातील बांधकाम परवानग्यांचा प्रश्न मार्गी लागला आहे.

     यावेळी आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा बांधकाम व्यावसायिक शिवराज मोरे, मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, क्रिडाईचे तनय जाधव, नगरसेवक राजेंद्र माने, इंद्रजीत गुजर, जावेद शेख, धनराज शिंदे आदी. उपस्थित होते.

     कराड व मलकापूर शहरासह आसपासच्या बांधकाम व्यावसायिकांना व नागरिकांसाठी हा अत्यंत महत्वाचा विषय असून त्याचे निराकारण माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या पुढाकाराने झाले आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या दिल्लीतील २२ वर्षांचा व केंद्रीय मंत्री पदाच्या अनुभवामुळे केंद्रातील अधिकाऱ्यांशी सुकर चर्चा करून यशस्वीपणे मार्ग काढण्यात त्यांना यश आले आहे. 

      गेल्या काही दिवसांपूर्वी विमान प्राधिकरणाकडून देशभरातील विमानतळाच्या परीघामधील २० किमी आसपासच्या बांधकामावर बंदी घातली गेली होती. तो नियम कराड विमानतळालाही लागू झाल्याने त्या अटींमध्ये शिथिलता व सुस्पष्टता यावी, यासाठी कराडच्या बांधकाम व्यावसायिकांनी व क्रिडाईच्या प्रतिनिधींनी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊन निवेदन देत चर्चा केली होती. यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी बांधकाम व्यावसायिकांचा विषय पूर्ण समजून घेत महाराष्ट्र प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी फोनवरून व त्यानंतर प्रत्यक्ष मुंबईमध्ये भेट घेऊन चर्चा केली. तसेच केंद्रीय पातळीवरही प्रयत्न करीत केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया व या विभागाचे सचिव संजीव कुमार यांच्याशी चर्चा करून कराड शहराच्या विमानतळाबाबत योग्य ती माहिती देत त्यांनी वस्तुस्तिथी मांडली तसेच जाचक अटी शिथिल करण्याची मागणी केली. त्यानंतरही महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांशी पृथ्वीराज चव्हाण यांनी चर्चा केल्याप्रमाणे महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी कलर कोडेड मॅप तयार करून मान्यतेसाठी केंद्रीय विभागाला पाठविला होता. तोच नकाशा (मॅप) तात्काळ प्रसिद्ध व्हावा, यासाठी आज आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी बांधकाम व्यावसायिकांसोबत केंद्रीय मंत्री व सचिवांची भेट घेऊन चर्चा केली.

    दरम्यान, गेल्या चार महिन्यापासून विमानतळ प्राधिकरणाच्या निर्बंधांमुळे कराड परिसरातील बांधकाम ठप्प आहेत. त्यांना लवकरात लवकर गती मिळण्यासाठी व शहराच्या विकासासाठी विमानतळ प्राधिकरणाने कलर कोडेड झोनिंग मॅप प्रसिद्ध करावा, अशी मागणी यावेळी चर्चेदरम्यान पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. त्यानुसार तात्काळ केंद्रीय मंत्र्यांच्या आदेशाची अंमलबजावणी करत संबंधित विमान प्राधिकरणाने कलर कोडेड झोनिंग मॅप देत त्याचा अध्यादेशही काढला आहे. त्यानुसारची नवीन नियमावलीही प्राधिकरणाकडे उपलब्ध झाली आहे.