कराडात भररस्त्यात अल्पवयीन युवकाचा निघृण खून

कराड येथील बाराडबरे परिसरात एका अल्पवयीन युवकाचा धारदार शस्त्राने वार करून निघृण खून झाल्याची घटना घडल्याने शहरासह तालुक्यात खळबळ एकच उडाली. सोमवारी 14 रोजी सायंकाळी ही घटना घडली. घटनेनंतर तीन संशयित आरोपींनी घटनास्थळावरून धूम ठोकली. आदित्य गौतम बनसोडे (वय 16) रा. बाराडबरे परिसर, कराड असे खून झालेल्या अल्पवयीन युवकाचे नाव आहे. घटनेची नोंद कराड शहर पोलीस ठाण्यात झाली असून पोलिसांनी तपासासाठी पोलीस पथके रवाना केली आहेत.

कराडात भररस्त्यात अल्पवयीन युवकाचा निघृण खून
संग्रहित फोटो

शहरात खळबळ : तीन संशयितांनी धारदार शस्त्राने केले वार, तपासासाठी पोलीस पथके रवाना 

कराड/प्रतिनिधी : 
         येथील बाराडबरे परिसरात एका अल्पवयीन युवकाचा  भररस्त्यात धारदार शस्त्राने वार करून निघृण खून झाल्याची घटना घडल्याने शहरासह तालुक्यात खळबळ एकच उडाली. सोमवारी 14 रोजी सायंकाळी ही घटना घडली. घटनेनंतर तीन संशयित आरोपींनी घटनास्थळावरून धूम ठोकली. आदित्य गौतम बनसोडे (वय 16) रा. बाराडबरे परिसर, कराड असे खून झालेल्या अल्पवयीन युवकाचे नाव आहे. घटनेची नोंद कराड शहर पोलीस ठाण्यात झाली असून पोलिसांनी तपासासाठी पोलीस पथके रवाना केली आहेत. 
           याबाबत पोलिसांकडून व घटनास्थळावरून मिळालेली अशी की, आदित्य बनसोडे हा सोमवारी दुपारच्या सुमारास बाराडबरे परिसरात रत्नवैभव किराणा स्टोअर्ससमोर उभा होता. त्यावेळी तीन संशयित युवकांनी येथे येऊन आदित्यवर वार करायला सुरूवात केली. यावेळी आदित्यने आरडाओरडा करायला सुरुवात केल्यानंतर तिनही संशयित आरोपींनी घटनास्थळावरून पसार झाले. त्यांनी आदित्यच्या पोटावर धारदार शस्त्राने वार केल्याने आदित्य मोठ्या प्रमाणात रक्तास्त्राव झाल्याने रस्त्यावर पडला. हा प्रकार पाहून परिसरातील नागरिक घटनास्थळी धावले. त्यानंतर आदित्यच्या कुटूंबियांनी त्याला तात्काळ उपचारासाठी नागरिकांच्या मदतीने उपजिल्हा रूग्णालयात हलवले. तेथे प्राथमिक उपचार करून त्याला पुढील उपचारासाठी कृष्णा रूग्णालयात हलवण्यात आले. परंतु,  कृष्णा रूग्णालयातील डॉक्टरांनी आदित्यला मृत घोषित केले. 
          या घटनेची माहिती मिळताच कराडचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रणजीत पाटील, वरिष्ठ पोलीस निरिक्षक बी. आर. पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून चौकशी सुरू केली. तसेच तपासला गती देत संशयितांच्या शोधासाठी तात्काळ पोलीस पथके रवाना केली आहेत. याप्रसंगी रात्री उशीरा आदित्याचे वडिल गौतम बनसोडे यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.