कराडात भरवस्तीत लागलेल्या आगीत 24 घरे खाक

शहरातील न्यायालय, बापूजी साळुंखे पुतळा, चर्च यशवंतराव चव्हाण सभागृह व बसस्थानकाच्या मध्यावर असलेल्या एका वस्तीला शनिवारी मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीत चार सिलेंडरचा स्फोट झाला. त्यामुळे झालेल्या मोठ्या आवाजाने कराड शहर हादरले. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसून त्यामध्ये 24 घरे जळून खाक झाले आहेत.

कराडात भरवस्तीत लागलेल्या आगीत 24 घरे खाक
कराडात भरवस्तीत लागलेल्या आगीत 14 घरे जाळून खाक झाली आहेत.

कराडात भरवस्तीत लागलेल्या आगीत 14 घरे खाक 

मध्यरात्री चार सिलेंडरचा स्फोट : सुदैवाने जीवितहानी टळली 

कराड/प्रतिनिधी : 

      येथील न्यायालय व बापूजी साळुंखे पुतळा परिसरात मध्यरात्री एका वस्तीला भीषण आग लागली. या आगीत चार सिलेंडरचा स्फोट झाला. त्यामुळे झालेल्या मोठ्या आवाजाने कराड शहर हादरले. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसून त्यामध्ये 24 घरे जळून खाक झाले आहेत. 

        याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, कराड येथील न्यायालय, बापूजी साळुंखे पुतळा, चर्च, यशवंतराव चव्हाण सभागृह आणि बसस्थानक याच्या मध्यावर असलेल्या एका वस्तीत शनिवारी मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीने रौद्ररूप धारण केले. त्यात चार सिलेंडरचा स्फोट झाल्याने आग आणखीनच भडकली. मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या स्फोटाच्या मोठ्या आवाजामुळे कराड शहर हादरले. या आगीमध्ये 14 घरे जळून खाक झाली असून त्यालगत असलेल्या  दुकानगाळ्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून यामध्ये तीन महिला जखमी झाल्या आहेत. 

       दरम्यान, न्यायालयातील सुरक्षारक्षकाच्या सदर वस्तीस आग लागल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत महिलांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यानंतर स्थानिक नागरिकांसह परिसरातील लोकही घटनास्थळी धावून आले. त्यानंतर याबाबतची कल्पना नगरपालिका व पोलीस प्रशासनास देऊन आग विझवण्यासाठी नगरपालिका व कृष्णा हॉस्पिटलच्या अग्निशमन बंबास पाचारण करण्यात आले. अग्निशामकच्या कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेत अथक परिश्रम करून आगीवर नियंत्रण मिळवले. 

       घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. रणजीत पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी.आर. पाटील, नगरसेवक विजयी वाटेगावकर पटवेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच संबंधित महिलांना नगरपालिकेच्या शाळा क्रमांक 3 मध्ये तात्पुरत्या निवाऱ्याची सोय करण्यात आली असून जखमींवर उपचार सुरू आहेत. 

      या घटनेची माहिती मिळताच राज्याचे सहकारमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच संबंधित महिला व जखमींची विचारपूस केली.