कराडात भीम आर्मीचे उद्या फटे कपडे आंदोलन

देशात सुरु असलेल्या खाजगीकरणा विरोधात भीम आर्मी आक्रमक झाली आहे. सरकारच्या खासगीकरण धोरणाला निषेध दर्शवण्यासाठी भीम आर्मीतर्फे येथील तहसिल कार्यालयासमोर गुरुवारी 24 रोजी फटे कपडे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती भीम आर्मीचे कराड तालुकाप्रमुख भागवत कांबळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. 

कराडात भीम आर्मीचे उद्या फटे कपडे आंदोलन

कराड/प्रतिनिधी : 
          देशात सुरु असलेल्या खाजगीकरणा विरोधात भीम आर्मी आक्रमक झाली आहे. सरकारच्या खासगीकरण धोरणाला निषेध दर्शवण्यासाठी भीम आर्मीतर्फे येथील तहसिल कार्यालयासमोर गुरुवारी 24 रोजी फटे कपडे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती भीम आर्मीचे कराड तालुकाप्रमुख भागवत कांबळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. 
          केंद्र सरकारने विविध क्षेत्राच्या खासगीकरणाचा धडाका लावला असून यामुळे सर्वसामान्यांचे मोठे नुकसान होणार आहेत. त्यामुळे भीम आर्मी आक्रमक झाली असून सरकारच्या खासगीकरण धोरणाला विरोध दर्शवण्यासाठी भीम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर आझाद (रावण) यांच्या नेतृत्वाखाली देशभरात 24 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी व तहसिल कार्यालयासमोर फाटके कपडे घालून आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच यावेळी जिल्हाधिकारी व तहसिलदार यांच्यामार्फत राष्ट्रपतींना विविध मागण्यांचे निवेदनही सादर करणार येणार आहे.
          याचाच एक भाग म्हणून गुरुवारी दुपारी 12 वाजता कराड तहसिल कार्यालयासमोर भीम आर्मीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष जावेद नायकवडी व जिल्हाध्यक्ष संतोष थोरवडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात तालुक्यातील प्रमुख कार्यकर्तेही सहभागी होणार असल्याची माहितीही कांबळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.