कराडात ‘फाईट द बाइट’ मोहीमेअंतर्गत ‘होम टू होम’ जनजागृती

डेंग्यूसह किटकजन्य आजार रोखण्यासाठी कराड नगरपालिका अंतर्गत ‘फाईट द बाइट’ मोहीम राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने शहरात पालिका आरोग्य विभागाच्या पथकाकडून ‘होम टू होम’ जनजागृती मोहीम हाती घेतली आहे.

कराडात ‘फाईट द बाइट’ मोहीमेअंतर्गत ‘होम टू होम’ जनजागृती
कराड : शहरात ‘फाईट द बाइट’ मोहीमेअंतर्गत ‘होम टू होम’ जनजागृती करताना आरोग्य पथकातील कर्मचारी.

कराडात ‘फाईट द बाइट’ मोहीमेअंतर्गत ‘होम टू होम’ जनजागृती 

आरोग्य पथकाची अंमलबजावणी : घरासह संपूर्ण परिसराची स्वच्छता करण्याबाबत माहिती,

कराड/प्रतिनिधी :

      शहरात डेंग्यूसह किटकजन्य आजार रोखण्यासाठी कराड नगरपालिका अंतर्गत ‘फाईट द बाइट’ मोहीम राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने पालिका आरोग्य विभागाच्या पथकाकडून ‘होम टू होम’ जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार सोमवारी शिक्षक कॉलनीमधील 83 घरात जाऊन ‘होम टू होम’ जनजागृती करण्यात आली.

     नगरपालिकेकडून शहरात ‘फाईट द बाइट’ मोहीम राबविण्यात येत असून नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृतीही करण्यात येत आहे. त्यामध्ये आरोग्य विभागाच्या पथकाकडून नागरिकांना घराच्या परिसरात असणारे पाण्याचे हौद, प्लास्टिक वस्तू, टायर, भंगार डबे, फ्रीज मागील ट्रे, झाडांच्या कुंड्या, नारळाच्या करवंट्या आदींमध्ये पाणी साचू न देणे व घरासह संपूर्ण परिसराची स्वच्छता करण्याबाबत माहिती देण्यात आली.

     तसेच संपूर्ण कराड शहरातील हॉस्पिटलमध्ये डेंग्यू, मलेरिया व चिकनगुनियाचे रुग्ण आहेत का? याचीही माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाच्या पथकाकडून घेण्यात आली. त्यामध्ये आज सोमवारी ४ रोजी शहरातील कोणत्याही हॉस्पिटलमध्ये सदरचे रुग्ण आढळले नाहीत. ही बाब शहराच्या आरोग्यासाठी चांगली असून ‘फाईट द बाइट’ व ‘होम टू होम’ जनजागृती मोहीम आणखी प्रभावीपणे राबवण्यात येणार असल्याचे आरोग्य पथकाकडून सांगण्यात आले आहे.

     दरम्यान, नगरपालिकेच्या या मोहिमेला नागरिकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत असून ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ म्हणत अनेकांनी आरोग्य पथकाच्या आवाहनानुसार स्वतःच्या घरासोबतच संपूर्ण परिसरही स्वच्छ ठेवणार असून त्याबाबत इतरांनामध्येही जनजागृती करणार असल्याचे सांगितले आहे.