कराडात मांडूळ व कासव विक्रीप्रकरणी चौघांना अटक

ओगलेवाडी-राजमाची ता. कराड येथे मांडूळ व कासव विक्री करण्यासाठी आलेल्या चौघांना सातारा वनविभागाच्या पथकाने ताब्यात अटक केली. या कारवाईत त्यांच्याकडून एक जिवंत कासव व मांडूळ आणि दुचाकी, मोबाईल असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

कराडात मांडूळ व कासव विक्रीप्रकरणी चौघांना अटक

कराडात मांडूळ व कासव विक्रीप्रकरणी चौघांना अटक

सातारा वनविभागाची कारवाई : ओगलेवाडी-राजमाचीत संशयित मुद्देमालासह ताब्यात

कराड/प्रतिनिधी :

     ओगलेवाडी-राजमाची ता. कराड येथे मांडूळ व कासव विक्रीप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. मांडूळ व कासवाची विक्री करण्यासाठी आले असता सातारा वनविभागाच्या पथकाने चौघा संशयितांना ताब्यात घेतले. आज रविवारी १७ रोजी सकाळी ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत त्यांच्याकडून एक जिवंत कासव व मांडूळ हस्तगत करण्यात आले आहे. 

     रोहित साधु साठे (वय 20) प्रशांत रामचंद्र रसाळ (वय 20) अविनाश आप्पा खुडे (वय 21) तिघेही रा. अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर, सुनील तानाजी सावंत (वय 28) रा. दिवड ता. माण, जि. सातारा अशी याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. तसेच त्यांच्याकडून दुचाकी गाड्या, 4 मोबाईल एक जिवंत कासव व मांडूळ असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

     याबाबत वनविभागाकडून मिळालेली माहिती अशी की, राजमाची (ऑगलेवाडी) ता. कराड येथे सांज सावली हॉटेलमध्ये चौघेजण जेवण करीत बसले होते. त्यांच्या  हालचाली संशयास्पद वाटल्याने वनविभागाचे सहाय्य वनसंरक्षक महेश झांजुर्णे, मानद वन्यजीव रक्षक तथा वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरो सदस्य रोहन भाटे, वनरक्षक विजय भोसले यांच्या फिरत्या पथकाने सदर हॉटेलमध्ये जाऊन सह्शायीतांची तपासणी केली. यावेळी त्यांच्याकडील एका पिशवीत जिवंत कासव , व एका पिशवीत एक जिवंत मांडूळ असल्याचे आढळून आले.

     सदर कासव हे इंडियन सॉफ्ट शेल्ड टरटल (कासव) व कॉमन सॅनड बोआ (मांडूळ) हे प्राणी वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 अंतर्गत शेड्युल 1 भाग 2 व शेड्युल 4 मध्ये येतात. त्यांना पकडणे, बाळगणे, विक्रीकरणे, मारणे हा वन्यजीव कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे सहायक वनसंरक्षक महेश  झांजुर्णे यांच्या नेतृत्वाखाली वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 अन्वय संबंधितांना अटक करून कलम 9 , 39 , 48अ, 49 , 50, 51 अन्वये त्यांच्यावर गुन्हा करून करण्यात आला आहे.

     सदर कारवाईत उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक महेश  झांजुर्णे, मानद वन्यजीव रक्षक तथा वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरो सदस्य रोहन भाटे, वनपाल ए.पी. सावखंडे, बाबुराव कदम, वनरक्षक उत्तम पांढरे, विजय भोसले, रमेश जाधवर, अरुण सोलंकी, वनपाल कोळे, सचिन खंडागळे, श्रीकांत चव्हाण हणमंत मिठारे, सुनीता जादव, दीपाली अवघड, शीतल पाटील यांचा सहभाग होता.