कराडात मृत पक्षी सापडत असल्याने घबराट

शहरातील काही ठिकाणी मृत पक्षी सापडत आहेत. हे मृत पक्षी सडलेल्या अवस्थेत असल्याने ते कशामुळे दगावले असतील, याबाबत नक्की निदान करता येत नाही.  दरम्यान, बर्ड फ्ल्युच्या अनुषंगाने मृत पक्षांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

कराडात मृत पक्षी सापडत असल्याने घबराट
संग्रहित फोटो

 

कराडात मृत पक्षी सापडत  असल्याने घबराट 

पक्षी सडलेल्या अवस्थेत : बर्ड फ्ल्युच्या अनुषंगाने नमुने तपासणीसाठी रवाना

कराड/प्रतिनिधी :
           शहरातील काही ठिकाणी मृत पक्षी सापडत असल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. हे मृत पक्षी सडलेल्या अवस्थेत असल्यामुळे ते नेमके कशामुळे दगावले असतील, याबाबत नक्की निदान करता येत नाही. दरम्यान, मृत पक्षांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्यामुळे शहरातील कोणत्याही भागात असे मृत पक्षी आढळल्यास नागरिकांनी तात्काळ त्याबाबतची कल्पना नगरपालिकेस द्यावी, असे आवाहन मुख्याधिकरी रमाकांत डाके यांनी केले आहे.
          कोरोनानंतर सध्या बर्ड फ्ल्युचाही धोका निर्माण झाला आहे. त्यात नुकतेच तालुक्यातील काही ठिकाणी कोंबड्या मृत  झाल्याने लोकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु, मृत कोंबड्यांचे अहवाल निगेटीव्ह आल्याने ग्रामस्थ, नागरिकांसह प्रशासनानेही सुटकेचा निश्वास टाकला होता.
          परंतु, आता कराड शहरातील काही ठिकाणी मृत पक्षी सापडत असल्याच्या घटना निदर्शनास आल्या आहेत. तसेच हे मृत पक्षी सडलेल्या अवस्थेत असल्यामुळे ते नेमके कशामुळे दगावले असतील, याबाबत नक्की निदान करता येत नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये आणखीनच घबराटीचे वातावरण निर्माण झाली असून लोक चांगलेच धास्तावले आहेत.
        मात्र, हे मृत पक्षी सडलेल्या अवस्थेत असल्यामुळे त्याचे निश्चित निदान करता येत नसून मृत पक्षांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. तरी नागरिकांनी त्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळेपर्यंत घाबरुन न जाता शहरातील  एखाद्या भागात मृत पक्षी आढळल्यास  नागरिकांनी तात्काळ त्याबाबतची कल्पना नगरपालिकेस द्यावी. त्यामुळे बर्ड फ्ल्यु सारख्या आजाराबाबतीत योग्य वेळी उपाययोजना करता येतील, असे आवाहन मुख्याधिकरी रमाकांत डाके यांनी केले आहे. 

 

शहरात काही ठिकाणी मृत पक्षी सापडतआहेत. ते सडलेल्या अवस्थेत असल्याने निश्चित निदान होत नाही. मृत पक्षांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून नागरिकांनी घाबरून न जाता मृत पक्षीआढळल्यास तात्काळ त्याबाबतची कल्पना नगरपालिकेस द्यावी. त्यामुळे आवश्यक त्या उपाययोजना करता येतील.

- रमाकांत डाके (मुख्याधिकरी, कराड)