कराडात पोलिस निरीक्षकांच्या केबिनमध्येच चाकू हल्ला

कराड शहर पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलिस निरिक्षक बी. आर. पाटील यांच्या केबिनमध्येच एकावर चाकू हल्ला झाला. पोलिस निरिक्षक पाटील यांनी तात्काळ हल्लेखोरास जागीच पकडले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला असून हल्लेखोरास पोलिसांनी अटक केली आहे.

कराडात पोलिस निरीक्षकांच्या  केबिनमध्येच चाकू हल्ला
संग्रहित फोटो

कराडात पोलिस निरीक्षकांच्या केबिनमध्येच चाकू हल्ला 

शहरात खळबळ : जखमीला उपचारासाठी हलवले रुग्णालयात, हल्लेखोर पोलिसांच्या ताब्यात 

कराड/प्रतिनिधी : 
           कराड शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक बी. आर. पाटील यांच्या केबिनमध्येच एकावर चाकू हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली. पूर्व वैमनस्यातून हा हल्ला झाला असून हल्ला करणाऱ्यास  पोलिस निरिक्षक पाटील यांनी तात्काळ जागीच पकडल्याने पुढील अनर्थ टळला. हल्लेखोरला पोलिसांनी अटक केली आहे. 
            लखन भागवत माने (40) रा. हजारमाची ता. कराड असे चाकू हल्ला करणाऱ्या संशयीताचे नाव आहे. किशोर पांडूरंग शिखरे (27) हाजारमाची ता. कराड असे हल्ल्यातील जखमीचे नाव आहे. 
            याबाबत मिळालेली माहिती अशी की, सोमवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास शहर पोलीस ठाण्यात पोलिस निरिक्षक बी. आर. पाटील यांच्या समोरच काही सेकंदात लखन माने याने किशोर शिखरे याच्या पाठ, मान व हातावर चाकूने तीन वार केले. हे वार शिखरे याच्या वर्मी लागले असून तो जखमी झाला आहे. पोलिसांनी तात्काळ त्याला उपचार उपचारासाठी रुग्णालयात हलवले आहे. भर दिवसा चक्क पोलिस निरिक्षकांच्या केबिनमध्येच चाकू हल्ल्याने पोलिस दलासह शहरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी हल्लेखोरास ताब्यात घेतले असून जखमीच्या फिर्यादीनुसार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.