कराडात शनिवारी ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांचे जाहीर व्याख्यान

दैनिक प्रीतिसंगम रौप्यमहोत्सवी महोत्सवी वर्षानिमित्त व यशवंत नगरी न्यूज नेटवर्कच्या व्दिदशक वाटचालीनिमित्त यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीचे औचित्य साधून शनिवारी १२ मार्च २०२२ रोजी सकाळी १० वाजता स्वर्गीय वेणूताई चव्हाण स्मारक, कराड येथे महाराष्ट्रातील ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांचे जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

कराडात शनिवारी ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांचे जाहीर व्याख्यान

कराडात शनिवारी ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांचे जाहीर व्याख्यान 

यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त दै. प्रीतिसंगम रौप्यमहोत्सव व यशवंतनगरी न्यूज नेटवर्क व्दिदशक वाटचालीनिमित्त आयोजन 

कराड/प्रतिनिधी :  

     दैनिक प्रीतिसंगम रौप्यमहोत्सवी महोत्सवी वर्षानिमित्त व यशवंत नगरी न्यूज नेटवर्कच्या व्दिदशक वाटचालीनिमित्त यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीचे औचित्य साधून शनिवारी १२ मार्च २०२२ रोजी सकाळी १० वाजता स्वर्गीय वेणूताई चव्हाण स्मारक, कराड येथे महाराष्ट्रातील ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांचे जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिक्कीम राज्याचे माजी राज्यपाल खा. श्रीनिवास पाटील उपस्थित राहणार आहेत. 

     याप्रसंगी, स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंती दिनानिमित्त सातारा जिल्ह्यातील साहित्यिकांचा सन्मान ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे व खा. श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. त्यामध्ये साहित्यिक विद्याधर गोखले, डॉ. शिवाजीराव ठोंबरे, महादेव साने, सी.डी. पवार, बबन पोतदार, डॉ. मच्छिंद्र सकटे, अॅड. संभाजीराव मोहिते, डॉ. सुभाषकुमार बोबडे, सुभाषराव गुरव, अरुण काकडे, बसवेश्वर चेणगे, शंकर कवळे, संदीप डाकवे, माणिक बनकर, अभयकुमार देशमुख, सौ. अनघा दातार, सुहास इनामदार या साहित्यिकांचा सन्मान होणार असल्याची माहिती संयोजक दैनिक प्रीतिसंगमचे संपादक शशिकांत पाटील व यशवंतनगरी न्यूज नेटवर्कचे संपादक विकास भोसले यांनी दिली. तसेच व्याख्यान व सन्मान सोहळा समारंभास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, आवाहनही संयोजकांकडून करण्यात आले आहे.