कराडात श्रीराममंदिर भूमिपूजनाचा गुढी उभारून आनंदोत्सव

अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीराममंदिराच्या शीलान्यासाचा सोहळा पार पडला. राम जन्मभूमीचा हा वाद सुमारे 500 वर्षाचा असून त्यातही न्यायालयीन लढा हा 70 वर्षाचा राहिला आहे. त्यामुळे हिंदू धर्मियांसाठी श्रीराम मंदिराचा मुद्दा हा आत्मसन्मानाचा बनला होता. अखेर श्रावण वद्य व्दितीया  5 ऑगस्ट रोजी अयोध्येत मंदिराचे  भूमिपूजन झाल्याने या सुवर्णक्षणाचा आनंदोत्सव कराड शहरात गुढी उभारून साजरा करण्यात आला. 

कराडात श्रीराममंदिर भूमिपूजनाचा गुढी उभारून आनंदोत्सव
श्रीराममंदिर भूमिपूजनाच्या आनंदाप्रित्यर्थ सोमवार पेठ येथे उभारण्यात आलेली गुढी 

कराड/प्रतिनिधी : 
         अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीराममंदिराच्या शीलान्यासाचा सोहळा पार पडला. राम जन्मभूमीचा हा वाद सुमारे 500 वर्षाचा असून त्यातही न्यायालयीन लढा हा 70 वर्षाचा राहिला आहे. त्यामुळे हिंदू धर्मियांसाठी श्रीराम मंदिराचा मुद्दा हा आत्मसन्मानाचा बनला होता. अखेर श्रावण वद्य व्दितीया  5 ऑगस्ट रोजी अयोध्येत मंदिराचे  भूमिपूजन झाल्याने या सुवर्णक्षणाचा आनंदोत्सव कराड शहरात गुढी उभारून साजरा करण्यात आला. 
        कराड येथे बुधवारी 5 रोजी श्रीराम जन्मभूमीच्या ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या भव्य मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याचा विविध पद्धतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी सोमवार पेठ भागातील बहुतांशी घरांसमोर आनंदाचे व शुभ प्रतिक म्हणून गुढी उभारण्यात आली होती. तसेच घरोघरी गोडाधोडाचे पदार्थ, जेवण बनवून, घरगुती पद्धतीने पूजा-अर्चा करूनही लोकांनी हा दिवस सणासारखा साजरा केला. 

गुढ्या, तोरणे उभारून हा क्षण चिरंतर स्मरणीय केला  

श्री रामजन्मभूमी आंदोलनात आम्ही अगदी लहानपणापासून सहभागी आहोत. आजचा दिवस पाच शतकांच्या प्रतिक्षेनंतर आपल्या सर्वांच्या भाग्यात आला. त्यामुळे सगळे कराडकर आनंदात आहेत. प्रभू रामचंद्र यांचे मंदिर निर्माणकार्यात प्रत्येकाने आपला खारीचा वाटा उचलून स्वतःला धन्य समजावे. आम्ही स्वतः गुढी उभारून या दिवसाचा आनंद साजरा केला असून देशातही अनेकांनी गुढ्या, तोरणे उभारून हा क्षण चिरंतर स्मरणीय केला आहे.              

          - केदार डोईफोडे (जिल्हा कार्यवाह, श्रीशिवप्रतिष्ठान)