कराडात तहसिलदारांनंतर नायब तहसिलदारही कोरोना पॉझिटिव्ह

कराडचे तहसीलदार विजय पवार यांची सोमवारी १० रोजी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. मंगळवारी कार्यालयातील सर्व कर्मचार्यांणची कोरोना टेस्ट सूरू करण्यात आली. त्यामध्ये नायब तहसिलदार आनंदराव देवकर यांचीही टेस्ट कोरोना पॉझिटिव्ह आली असून त्यांच्यासह अन्य सहा जणांची टेस्टही पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे तहसील व प्रांत कार्यालयातील कर्मचारी धास्तावले आहेत.

कराडात तहसिलदारांनंतर नायब तहसिलदारही कोरोना पॉझिटिव्ह

कराडात तहसिलदारांनंतर नायब तहसिलदारही कोरोना पॉझिटिव्ह 

कार्यालयात सॅनीटराईज : अन्य सहा जणांचीही टेस्टही पॉझिटिव्ह आल्याने कर्मचाऱ्यांमध्ये धास्ती 

कराड/प्रतिनिधी : 

       कराड शहरासह तालुक्यातही हळूहळू कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. नुकतेच कराडचे तहसीलदार विजय पवार यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. त्यामुळे तहसील कार्यालयात खळबळ उडाली असून कार्यालयातील सर्व कर्मचार्यांुची कोरोना टेस्ट सूरू करण्यात आली. त्यामध्ये नायब तहसिलदार आनंदराव देवकर यांचीही टेस्ट कोरोना पॉझिटिव्ह आली असून त्यांच्यासह अन्य सहा जनही पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे तहसील कार्यालयातील कर्मचारी धास्तावले आहेत.  

       तहसीलदार विजय पवार यांची सोमवारी 10 रोजी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर नगरपालिकेच्या नागरी आरोग्य केंद्राच्या वतीने मंगळवारी 11 रोजी तहसील कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. त्यामध्ये नायब तहसिलदार आनंदराव देवकर यांचीही टेस्ट कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. तसेच त्यांच्यासह तहसील व प्रांत कार्यालयातील मोरे, संकपाळ, गुलानी आदींसह अन्य ३ कर्मचाऱ्यांची टेस्टही पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे तहसील व प्रांत कार्यालयात एकच खळबळ उडाली आहे. 

        दरम्यान, नगरपालिकेचे नागरी आरोग्य केंद्र व आरोग्य विभागाच्या वतीने तहसील व प्रांत कार्यालय पूर्णपणे सॅनीटराईज करण्यात आले आहे. तसेच या दोन्ही कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचीही कोरोना टेस्ट करण्याचे काम सुरु आहे. त्याचबरोबर कराड, मलकापूरसह तालुक्यात वाढत्या कोरोना पॉझिटिव्ह रेटच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कडक निर्बंध लावले असून नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचनाही नगरपालिका व पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत.