कराडातील तीन कोरोना योध्यांना विमा संरक्षण

कोरोनासारख्या महामारीच्या संकटकाळात अनेक कोरोना योध्ये लोकांची मदत करत आहेत. यामध्ये ते अनेकांचे जीव वाचवण्यासाठी अहोरात्र प्रयत्नशील असून प्रसंगी आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत. शहरातील जयंत बेडेकर, ओंकार आपटे, गणेश पवार योध्यांना ब्राह्मण समाज संस्थेच्या वतीने प्रत्येकी तीन लाख रुपयांची पॉलिसी देऊन नुकतेच सन्मानित केले आहे.

कराडातील तीन कोरोना योध्यांना विमा संरक्षण
कराड : कोरोना योध्यांचा सन्मान करताना डॉ. अनिरुद्ध दीक्षित, अभिजित चाफेकर व विकास देशपांडे

ब्राह्मण समाज संस्थेकडून सन्मान : जयंत बेडेकर, ओंकार आपटे, गणेश पवार यांना तीन लाखांचे विमा संरक्षण 

कराड/प्रतिनिधी :

     कोरोनासारख्या महामारीच्या संकटकाळात अनेक कोरोना योध्ये लोकांची मदत करत आहेत. यामध्ये ते अनेकांचे जीव वाचवण्यासाठी अहोरात्र प्रयत्नशील असून प्रसंगी आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत. शहरातील जयंत बेडेकर, ओंकार आपटे, गणेश पवार योध्यांना ब्राह्मण समाज संस्थेच्या वतीने प्रत्येकी तीन लाख रुपयांची पॉलिसी देऊन नुकतेच सन्मानित केले आहे.

     ब्राह्मण समाज संस्थेचे डॉ. अनिरुद्ध दीक्षित, उद्योजक अभिजित चाफेकर, संस्थेचे उपाध्यक्ष विकास देशपांडे यांच्या हस्ते हे विमा संरक्षण देण्यात आले. यावेळी संस्थेचे खजिनदार प्रशांत कुलकर्णी, सहसचिव अवधूत कुलकर्णी, संचालक अरुण प्रभूणे आदी. उपस्थित होते.

    शहरात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने रुग्ण संख्येतही मोठी वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत रुग्णांसह नागरिकांमध्ये कोरोना संसर्गाबाबतची जनजागृती करण्यापासून त्यांना विविध प्रकारचे सहकार्य,  मदत करणे, आवश्यकतेनुसार रुग्णांच्या घरी जाऊन ऑक्सिजन मशीन लावणे आदी. प्रकारे त्यांनी लोकांना मोलाची मदत केली आहे. या तिघांच्या कार्यतत्परतेमुळे शहरातील अनेक नागरिकांचे प्राण वाचले आहेत. याची दखल घेत ब्राह्मण समाज संस्थेने सामाजिक बांधिलकी जोपासत तिघांनाही प्रत्येकी तीन लाख रुपयांची पॉलिसी देऊन सन्मानित केले आहे.