कराडातील वाखान परिसरात महिलेचा खून

वाखान परिसरात एका महिलेचा खून झाल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली आहे. कराड पोलिसांनी तपासास सुरुवात केली असून परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरेही तपासण्यात येत आहेत.

कराडातील वाखान परिसरात महिलेचा खून
कराडातील वाखान परिसरात महिलेचा खून

कराडातील वाखान परिसरात महिलेचा खून 

कराड/प्रतिनिधी : 

          येथील वाखान परिसरात एका महिलेचा खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शनिवारी 25 रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच कराड पोलिसांनी  घटनास्थळी धाव घेतली. 

       उज्वला ठाणेकर (वय 32) रा. वाखान परिसर, कराड असे मृत महिलेचे नाव आहे. 

       याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, वाखान परिसरात एका महिलेचा खून झाल्याची घटना घडली आहे. शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रणजित पाटील, कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर यांच्यासह पोलिस अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. 

       याप्रकरणी कराड पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असून या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरेही तपासण्यात येत आहेत. दरम्यान, सदर गुन्हे शाखेचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.