कराडकरांची आता पुन्हा स्वच्छतेसाठी वज्रमुठ

स्वच्छतेत कराड शहराने देशात सलग दोन वर्ष प्रथम क्रमांक मिळवण्याचा बहुमान पटकावला. त्यामुळे देशभरात कराडचे नाव अधोरेखित झाले. त्यानंतर कोरोना काळात हॉटस्पॉट ठरलेल्या कराडमध्ये कोरोनाला हद्दपार करण्यासाठी सर्व कराडकर एकवटल्याचे दिसून आले. आता शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरत चालला आहे. त्यामुळे स्वच्छतेची हॅट्रिक साधण्यासाठी पुन्हाएकदा कराडकरांनी स्वच्छतेवर लक्ष केंद्रित केले असून नियोजन सभापती विजय वाटेगावकर यांनी पुढाकार घेत विविध ठिकाणी स्वच्छता अभियान राबवण्यास सुरुवात केली आहे.

कराडकरांची आता पुन्हा स्वच्छतेसाठी वज्रमुठ
कराड : स्मशानभूमी परिसरात स्वच्छता अभियान राबवताना विजय वाटेगावकर, पालिका कर्मचारी आदी.

कराडकरांची आता पुन्हा स्वच्छतेसाठी वज्रमुठ 

नियोजन सभापती विजय वाटेगावकर यांचा पुढाकार 

कराड/प्रतिनिधी :
          स्वच्छतेत कराड शहराने देशात सलग दोन वर्ष प्रथम क्रमांक मिळवण्याचा बहुमान पटकावला. त्यामुळे देशभरात कराडचे नाव अधोरेखित झाले. त्यानंतर कोरोना काळात हॉटस्पॉट ठरलेल्या कराडमध्ये कोरोनाला हद्दपार करण्यासाठी सर्व कराडकर एकवटल्याचे दिसून आले. आता शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरत चालला आहे. त्यामुळे स्वच्छतेची हॅट्रिक साधण्यासाठी पुन्हाएकदा कराडकरांनी स्वच्छतेवर लक्ष केंद्रित केले असून नियोजन सभापती विजय वाटेगावकर यांनी पुढाकार घेत विविध ठिकाणी स्वच्छता अभियान राबवण्यास सुरुवात केली आहे.
          नियोजन सभापती विजय वाटेगावकर यांनी मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून पुन्हाएकदा स्वच्छता अभियान हाती घेतले आहे. शुक्रवारी 2 रोजी येथील कोल्हापूर नाक्यावर महामार्गावरील उड्डाणपुलाखालच्या भागाची स्वच्छता केली. तसेच शनिवारी 3 रोजी शहरातील वैकुंठधाम स्मशानभूमीत परिसरातही त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता अभियान राबवण्यात आले. तर सोमवारी 5 रोजी येथील बस स्थानक परिसराचीही स्वच्छता करण्यात आली. या सर्व मोहिमांमध्ये वाटेगावकर यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला.
         महापूर, नदीकाठ परिसरातील तात्पुरत्या पुनर्वसित झोपडपट्टी धारकांना मदत, कुंभार वाड्यातील गणेशमूर्तीकारांना पूरस्थितीत मदत, बचाव कार्यातही पुढाकार, नगरपालिकेने स्वच्छतेत सलग दोन वर्षे देशात प्रथम क्रमांक पटकाविल्याच्या यशात मोलाचा वाटा, शहराच्या सुशोभिकरणाचा ध्यास घेऊन नवनवीन संकल्पना राबविण्याचा अट्टहास, त्याचबरोबर कोरोना काळात प्रत्येक कराडकारच्या मदतीसाठी असलेली कार्यतत्परता, विविध माध्यमातून केलेली मदत आदी. गोष्टींमधून वाटेगावकर यांच्या कर्तव्यदक्षतेची झलक कराडकरांना पाहायला मिळाली आहे.
         आता शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी होत चालला असून शहराला पुन्हा देशात स्वच्छतेमध्ये सलग तिसऱ्यांदा येण्याचा बहुमान मिळण्याच्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न सुरु केले आहेत. त्यामध्ये मुख्याधिकाऱ्यांसह, सभापती महेश कांबळे, आर. डी. भालदार व अन्य अधिकारी, स्वच्छता व आरोग्य कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते आणि सजग कराडकर नागरिकांनीही एकत्रित येत स्वच्छता अभियानास सुरुवात केली आहे. यामध्ये नियोजन सभापती विजय वाटेगावकर स्वच्छता अभियान यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न करत आहेत.