केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा तुघलकी निर्णय मागे घ्यावा - बळीराजाची मागणी

केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा तुघलकी निर्णय मागे घ्यावा - बळीराजाची मागणी
कराड: प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देताना साजिद मुल्ला व इतर

प्रांताधिकाऱ्यांना दिले मागण्यांचे निवेदन : बंदी न उठवल्यास तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा 

कराड/प्रतिनिधी : 
          केंद्र सरकारने कांद्यावर निर्यातबंदी लावली आहे. त्यामुळे कांद्याचे दर ढासळले असून ते आणखी घसरण्याची शक्यता आहे. कोरोना, अतिवृष्टी व अन्य कारणांनी शेतकरी आधीच अडचणी सापडले असताना सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये केंद्र सरकारविरोधात संतापाची लाट उसळली आहे. केंद्र सरकारचा हा जुल्मी, तुघलकी निर्णय असून तो तात्काळ मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेने निवेदनाद्वारे दिला आहे. 
          कांद्यावर निर्यातबंदी उठवण्यासह अन्य मागणीसाठी मंगळवारी 15 रोजी दुपारी बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने प्रांताधिकारी उत्तम दिघे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख व सातारा जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला, उपजिल्हाध्यक्ष सुनील कोळी, युवा जिल्हाध्यक्ष विश्वास जाधव, कराड उत्तर युवा अध्यक्ष रघुनाथ माने, प्रकाशराव पाटील, पोपट जाधव व शेतकरी उपस्थित होते. 

* सविस्तर वृत्तसाठी वाचा उद्याचा दैनिक प्रीतिसंगम*