किल्ले वसंतगडावर वास्तुदर्शक फलक लोकार्पण संपन्न

किल्ले वसंतगडावर ‘जतन स्वराज्याचे; संवर्धन गडकिल्ल्यांचे’ परिवाराकडून वास्तुदर्शक फलक लावण्याचा संकल्प करण्यात आला होता. त्यांनी एका आठवड्यात त्याची संकल्पपूर्ती करत रविवारी 2 जानेवारी रोजी वसंतगडावर वास्तुदर्शक फलक उभारून त्याचे उत्साहात लोकार्पण करण्यात आले.

किल्ले वसंतगडावर वास्तुदर्शक फलक लोकार्पण संपन्न
वसंतगड : किल्ले वसंतगडावर वास्तुदर्शक फलक लोकार्पण सोहळ्यावेळी जतन स्वराज्याचे; संवर्धन गडकिल्ल्यांचे’ आणि टीम वसंतगडचे सदस्य व मान्यवर.

फोटो : वसंतगड : किल्ले वसंतगडावर वास्तुदर्शक फलक लोकार्पण सोहळ्यावेळी जतन स्वराज्याचे; संवर्धन गडकिल्ल्यांचे’ आणि टीम वसंतगडचे सदस्य व मान्यवर.

किल्ले वसंतगडावर वास्तुदर्शक फलक लोकार्पण संपन्न 

दुर्गप्रेमींमधून समाधान : जतन स्वराज्याचे; संवर्धन गडकिल्ल्यांचे’ परिवाराकडून उभारणी

कराड/प्रतिनिधी :

     किल्ले वसंतगड येथे ‘जतन स्वराज्याचे; संवर्धन गडकिल्ल्यांचे’ परिवाराकडून वास्तुदर्शक फलक लावण्याचा संकल्प केला होता. तो संकल्प त्यांनी एका आठवड्यात पूर्ण करत रविवारी 2 जानेवारी रोजी किल्ले वसंतगडावर वास्तुदर्शक फलक लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

      वसंतगडचे सरपंच अमित नलवडे यांच्या हस्ते वास्तुदर्शक फलकाचे  लोकार्पण करण्यात आले. या कार्यात ‘जतन स्वराज्याचे; संवर्धन गडकिल्ल्यांचे’ परिवारास टीम वसंतगड आणि तळबीडचे आनंद चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.

      दरम्यान, ‘जतन स्वराज्याचे; संवर्धन गडकिल्ल्यांचे’ या परिवारातील सर्व सदस्यांनी गडावर वास्तुदर्शक फलक लावून खूप चांगले काम केले आहे. आपण केलेल्या कार्यामुळे गडावर येणाऱ्या दुर्गप्रेमींना गडावरील सर्व वास्तु पाहणे सोयीस्कर होणार आहे. तसेच यातील प्रत्येक वास्तुदर्शक फलकावर खूप छान वाक्य लिहिण्यात आली आहेत. ही वाक्य वाचून नक्कीच गडावर येणारे दुर्गप्रेमी आपापल्यात अपेक्षित बदल करतील, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.

      तत्पूर्वी, टीम वसंतगड, तळबीड आणि वसंतगड ग्रामस्थांच्या वतीने या कार्यात प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या मदत करणाऱ्या ‘जतन स्वराज्याचे; संवर्धन गडकिल्ल्यांचे’ परिवारातील सदस्यांचे आभार व्यक्त करण्यात आले. तय्चाबरोबर या संकल्प व उपक्रमाचे दुर्गप्रेमींमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.