कृष्णेची निवडणुक सर्व शक्तीनिशी लढणार

ना. विश्वजीत कदमःएकीकरणाची चर्चा सुरूःप्रयत्नाला यश येणार

कृष्णेची निवडणुक सर्व शक्तीनिशी लढणार

कृष्णेची निवडणुक सर्व शक्तीनिशी लढणार


ना. विश्वजीत कदमःएकीकरणाची चर्चा सुरूःप्रयत्नाला यश येणार

 

यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणुक सर्व ताकदीनीशी लढवणार असून डॉ. इंद्रजित मोहिते यांच्या साठी या निवडणुकीत साम-दाम-दंड-भेद या नितीचा अवलंब करत लागील ती मदत करणार असून डॉ. इंद्रजित मोहिते व अविनाश मोहिते यांच्या एकीकरणाची चर्चा सुरू असून आधी नेत्यांचे एकीकरण करायचे असते. आणि त्यानंतर कार्यकर्त्यांचे हा प्रयत्न सुरू आहे. तसेच चर्चेच्या बैठका झाल्या आहेत. अशी माहिती सहकार व कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिली.


डॉ. इंद्रजित मोहिते यांच्या निवासस्थानी ते आले असता. पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले कृष्णा कारखान्याची निवडणुक आम्ही सर्व शक्तीनिशी लढणार आहोत. मी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. जी मदत डॉ. इंद्रजित मोहिते यांना लागेल ती करणार. निवडणुकीसाठी मी या ठिकाणी स्वतः तळ ठोकून बसणार आहे. काही झाले तरी या निवडणुकीत आम्ही मागे राहणार नाही. त्यासाठी जे जे करावे लागेल ते करणार.कृष्णेची निवडणुक गतवेळी तिरंगी झाली होती. मात्र यावेळी ही दुरंगी करण्याचा प्रयत्न आमचा असून डॉ. इंद्रजित मोहिते व अविनाश मोहिते यांना एकत्रित आणण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. त्या अनुशंगाने आमच्य बैठकाही पार पडल्या आहेत. लग्न ठरवायच म्हंटल तर प्रयत्न करावा लागतो. त्याच पद्धतीने या दोद्यांना एकत्र आणण्यासाठी आमचा प्रयत्न राहील. कॉग्रेसचे सर्व कार्यकर्ते एकत्रिकरणाला अग्रेय आहेत. त्या अनुशंगाने चर्चेच्या फैरी सुरू आहेत. हे दोन नेते एकत्रित आल्यानंतर बाकीचे काय याचाही फैसला करू. कोणत्याही परिस्थितीत ही निवडणुक निखारीची म्हणून लढणार आहे.

 

कराड / प्रतिनिधी