पूरग्रस्तांच्या मदतीवर सरकारची जाहिरात 

पूरग्रस्तांच्या  मदतीवर सरकारची जाहिरात 
dev-madat

 


कोल्हापूर / प्रतिनिधी-

कोल्हापूर सह सातारा सांगली मध्ये हे महापुराचे थैमान घातला आहे हजारो लोक आजही या महापुरात अडकून पडले आहेत अनेक राजकीय मंडळी नेते पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे सरसावत आहेत असं चित्र असलं तरी आता याच मदतीत राजकारण होताना दिसत आहे                                                                                    पूरग्रस्तांच्या दिला जाणाऱ्या मदती वरती मुख्यमंत्र्यांचा आणि स्थानिक आमदाराचा फोटो असलेलं जाहिरात केल्याचा प्रकार कोल्हापुरात उघडकीला आला आहे एका बाजूला मदत उशीरा पोहोचली म्हणून विरोधकांकडून आरोप सुरू असताना आता पुरग्रस्तांच्या मदतीवर सरकारची जाहिरात असल्याने प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. राज्य सरकारकडून पुरगस्तांना अन्नधान्याचा पुरवठा केला जात आहे. पुरवठा करण्यात येणारे धान्य रेशनिंगचे आहे. त्यावर हातकणंगलेमधील भाजप आमदार सुरेश हाळवणकर यांनी या अन्न धान्यांच्या पॅकेट्सवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह आपल्या फोटोचे स्टीकर्स लावले आहेत. स्टीकर्स लावलेले धान्य पूरग्रस्तांना पोहोचताच तीव्र प्रतिक्रिया सोशल मीडियातून उमटल्या. आमदार हाळवणकर यांनी फेसबुकवर स्टीकर्स लावलेल्या पॅकेट्सची पोस्टही शेअर केली. त्यामुळे अत्यावश्यक असलेल्या मदतीवर भाजप सरकार जाहिरातबाजी करत असल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटल्या. स्टीकर्सवर स्थानिक समिर शिंगटे आणि सुधाकर भोसले यांची देखील नावे आहेत.                                                                                                                                            वाद निर्माण झाल्यानंतर हाळवणकर यांनी बाजू सावरण्याचा प्रयत्न करताना आपण हे केले नसल्याचा दावा केला. ते म्हणाले, पूरग्रस्तांना अन्नधान्य पुरवण्याबाबात शासन निर्णय आल्यानंतर आम्ही तातडीने बैठक घेतली. त्यानंतर पॅकेट्स तयार करण्यात आली. रेशन दुकानदारांनी त्यावर ते स्टीकर्स चिकटवले आहेत. त्यानंतर मी दुकानदारांशी चर्चा केली असून ते स्टीकर काढण्यास सांगितले आहे